महाराष्ट्र महाविद्यालय तर्फे लांबोटा वन उद्यानात वृक्ष लागवड.
निलंगा महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा राष्ट्रीय सेवा योजना विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व वनपरिक्षेत्र अधिकारी, विभागीय कार्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने ” *हरित लातूर सुंदर लातूर” या अभियानांतर्गत* भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यानिमित्त लांबोटा,ता. निलंगा येथील वन उद्यानाच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. याप्रसंगी निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. संभाजीराव पाटील निलंगेकर, हे उपस्थित होते यावेळी बोलताना त्यांनी पर्यावरणाप्रती सर्वांनी जागरूक राहण्याचा संदेश दिला पर्यावरण हे आपल्या सर्वांच्या निरोगी जीवनाचा आधार आहे त्यामुळे सर्वांनी अधिकाधिक वृक्षारोपण करून त्यांचे जतन संवर्धन करावे असे आवाहन त्यांनी केले यावेळी निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके, तहसीलदार, प्रसाद कुलकर्णी, वनपरिक्षेत्र अधिकारी एस. पी. पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे, पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी डॉ. विठ्ठल सांडूर, प्रा. शिवरुद्र बदनाळे, वन विभाग, महसूल विभाग व पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी , तसेच राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छत्र सेना विभागाचे विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
