• Thu. Aug 14th, 2025

खरोसा येथील वर्षावास महोत्सव कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे-पू. भन्ते सुमेध नागसेन.

Byjantaadmin

Aug 14, 2025

खरोसा येथील वर्षावास महोत्सव कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे.

पू. भन्ते सुमेध नागसेन.

निलंगा – बुद्ध लेणी खरोसा ता. औसा येथील 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य दिव्य अशा वर्षावास महोत्सवात लातूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील बौद्ध बांधवासह दलितोत्तर मातंग, चर्मकार, चांभार , मला जंगम या व इतर भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचे फायदे घेणाऱ्या सर्व दलित बहुजनांनी या भव्यदिव्य साजरा होणाऱ्या वर्षावास महोत्सवात हजारोंच्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान खरोसा येथील सुप्रसिद्ध बुद्ध लेणीचे रक्षण करते पूजनीय भंतेजी सुमेध नागसेन यांनी केले आहे.

या 17 आगस्ट वार रविवार 2025 रोजी साजरा होणाऱ्या वर्षावास महोत्सवा च्या कार्यक्रमाला थायलंड, कंबोडिया , व्हिएतनाम येथील जगप्रसिद्ध भंतेजी उपस्थित राहणार आहेत.तरी निलंगा, औसा या दोन्ही तालुक्यातील लाखो बौद्ध बांधवांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान खरोसा बुद्ध लेणी येथील पूज्य भन्तेजी सुमित नागसेन यांनी केले आहे.या कार्यक्रमाला जिल्ह्याचे माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, औसा विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अभिमन्यू पवार, उमरगा विधानसभेचे माजी आमदार ज्ञानेश्वर चौगुले, औसा येथील शैलेश दादा उटगे, व्ही एस पॅंथर चे संस्थापक अध्यक्ष विनोद खटके, डॉ. श्याम लोकरे, प्रा. डॉ. प्रदीप रोडे सर, संपादक चेतन शिंदे छत्रपती संभाजी नगर यांच्यासह चंद्रकांत चिकटे लातूर प्राध्यापक अनंत लांडगे, अंकुशराव ढेरे, अँड जगदीश दादा सूर्यवंशी सेवानिवृत्त रजिस्टर रजनीकांत आबा कांबळे इत्यादी सह लातूर , औसा, निलंगा येथील प्रमुखांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा साजरा होणार आहे.

पुढे भन्तेजी सुमित नागसेन यांनी सांगितले की महात्मा गौतम बुद्धांनी आपल्याला बौद्ध धम्माचे रक्षण करण्यासाठी सर्व बौद्ध बांधवांसह संपूर्ण बहुजनवादी संघटनांनी एकत्र येऊन आपल्या धम्माची चळवळ पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी निळ्या ध्वजाखाली एकत्रित येऊन लढा देऊन संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला बौद्धमय करावे लागेल असे आव्हान पूज्य भंतेजी सुमित नागसेन यांनी केले आहे.सध्या राज्यासह संपूर्ण भारतात बौद्ध धर्माला बदनाम करण्याचे षडयंत्र केले जात असून अशा माथेफिरू समाज घटकासह राज्यकर्त्याकडून काय आदर्श घ्यावा असा संतप्त सवाल? नागशेन यांनी दैनिक रत्नापूर समाचार शी बोलताना सांगितले.

ती पुढे म्हणाली की राज्यासह देशातील जेवढे बौद्धांचे पर्यटन स्थळे आहेत तेथील बौद्ध भिकूंच्या ताब्यात देण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केले असून अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झाला नसल्याचे पूज्य भंतेजी सुमित नागसेन यांनी केली आहे .तरी बौद्ध धम्माची आचार विचार सध्याच्या पिढीला व बहुजनाला धम्माच्या छत्रछायेखाली आणण्यासाठी व बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी 17 ऑगस्ट रोजी होणाऱ्या भव्य दिव्य वर्षावास महोत्सवाला हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे कळकळीचे आव्हान पूज्य भंतेजी सुमेध नागशेन यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *