महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा तर्फे ” हर घर तिरंगा ” यात्रेचे आयोजन.
निलंगा – महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना या विभागाच्या वतीने शासनाच्या परिपत्रकानुसार निलंगा शहरात “हर घर तिरंगा” यात्रेचे आयोजन दिनांक 13- 8 – 2025 करण्यात आले . या यात्रेची सुरुवात महाराष्ट्र महाविद्यालया पासून ते शहरातील मुख्य रस्त्यावरून आनंदमुनी चौक व परत महाराष्ट्र महाविद्यालय अशी सांगता करण्यात आली . यात्रेच्या वेळी विद्यार्थ्यांनी ‘ हर घर तिरंगा’ घर घर तिरंगा अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.यावेळी महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ कर्मवीर कदम, उपप्राचार्य डॉ बी एस गायकवाड, उपप्राचार्य प्रशांत गायकवाड राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ विठ्ठल सांडूर ,प्रा शिवरुद्र बदनाळे, प्रा. श्रीकृष्ण दिवे एन. सी.सी. ऑफिसर डॉ सचिन बसुदे ,डॉ गोपाळ मोघे ,डॉ अशोक तुगावे, प्रा दत्ता गोसलवाड ,प्रा अभिजीत गोसावी तसेच निलंगा येथील गटशिक्षणाधिकारी श्री गायवाड, श्री अतुल देशमुख, श्री डोईजोडे साहेब, श्री गुंडुरे सर, व सर्व प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनीं या यात्रेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते .
