संभाजी ब्रिगेड लातूर जिल्हा अध्यक्षपदी झुंजार नेतृत्व प्रमोद कदम यांची निवड
निलंगा / :- प्रतिनिधी
शाहू ,फुले ,आंबेडकर यांचा विचार समाजापुढे मांडून छत्रपती शिवरायांचा खरा आदर्श समाजापुढे मांडणाऱ्या संभाजी ब्रिगेड पार्टीच्या लातूर जिल्हा अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे झुंजार नेतृत्व शिवश्री प्रमोद कदम यांची निवड करण्यात आली आहे.
ही निवड पुणे येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष मनोजदादा आखरे,प्रदेश महासचिव शिवश्री सौरभ पुरुषोत्तम खेडेकर, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार,मुख्प्रवक्तेगंगाधर बनबरे,उपाध्यक्ष अण्णासाहेब सावंत,विभागीय कार्याध्यक्ष वैजिनाथ जाधव,यांनी नियुक्तीपत्र देऊन ही निवड करण्यात आली.
शिवश्री प्रमोद कदम हे निलंगा तालुका संभाजी ब्रिगेडची धुरा हातात सांभाळून सकल मराठा बहुजन समाजातील सर्वसामान्य नागरिकाचे प्रश्न उचलून धरून त्याला शासन दरबारी न्याय देण्यासाठी सतत लढले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आज त्यांना जिल्हास्तरावर काम करण्याची संधी मिळाली या संधीचे सोने करून छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वसामान्य नागरिकाच्या अडीअडचणी प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी व संभाजी ब्रिगेडचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्यासाठी, व न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहीन असे नूतन जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम यांनी सांगितले या निवडीचे लातूर जिल्ह्यासह सकल मराठा,बहुजन समाज बांधव व संभाजी ब्रिगेड पदाधिकारी करत आहेत.
