‘कर्मयोगी’ डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे स्मृतिदिनानिमित्त विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न
निलंगा (प्रतिनिधी )
डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, भित्तिपत्रक स्पर्धा, रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होते. या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी महाराष्ट्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम म्हणाले, “की सर्व विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊ आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा.”तसेच महाराष्ट्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य यांनी कनिष्ठ महाविद्यालय मध्ये चालत असलेल्या विविध उपक्रमाची व कोर्सेसची माहिती दिली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.सूर्यकांत वाघमारे, डॉ. बालाजी हजारे, डॉ. अशोक तुगावे प्रा. श्रीराम पौळकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रीकृष्ण दिवे यांनी केले. तर आभार प्रा. दत्ता गोसलवाड यांनी मानले यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
