आर. व्ही. देशमुख यांना उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्कार, महसूल दिनी जिल्हाधिका-यांच्या हस्ते झाला गौरव
—————————————————————–
निलंगा:- निलंगा तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असणारे निटूर ता. निलंगा येथिल राजकुमार विश्वंभरराव देशमुख यांना शासनाच्या महसूल दिनाचे अवचित्य साधून उत्कृष्ट मंडळ अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्या हस्ते हा पुरस्कार लातूर येथे दिमाखदार कार्यक्रमात प्रदान करण्यात आला देशमुख यांना हा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मुळचे निटूर ता. निलंगा येथिल राहणारे व सध्या तहसिल कार्यालय निलंगा येथे मंडळ अधिकारी पदावर कार्यरत असणारे राजकुमार विश्वभरराव देशमुख यांना यापूर्वी उत्कृष्ट तलाठी व काही दिवसापूर्वी मंडळ अधिकारी पदी असताना चांगल्या कार्याबद्द्ल पुरस्कार मिळाला होता त्यानंतर आता पुन्हा महसूल सप्ताह मध्ये जिल्हाधिकारी यांच्या हस्ते तीसरा पुरस्कार मिळाल्याने आर व्ही देशमुख निटूर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
