महानगरपालिकेत बचत गटाच्या वतीने तिरंगाबाबत झेंडा व विविध वस्तू विक्री केंद्र सुरु शहरातील नागरिकांनी भेट देऊन खरेदी करावी – आयुक्त श्रीमती मानसी
लातूर/प्रतिनिधी : मनपा आयुक्त श्रीमती मानसी यांच्या आदेशानुसार व अतिरिक्त आयुक्त देविदास जाधव व उपायुक्त डॉ. पंजाब खानासोळे यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर शहर महानगरपालिका दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान ( DAY- NULM ) अंतर्गत लातूर महानगरपालिकेच्या आवारात सम्यक महिला बचत गट व कुंजन महिला बचत गटांच्या वतीने शहरातील नागरिकांसाठी तिरंगा थीमबाबत झेंडा व इतर विविध वस्तू विक्री केंद्र सुरु करण्यात आले. याचे उद्घाटन आयुक्त श्रीमती मानसी यांचे हस्ते करण्यात आले. आणि सदर महिला बचत गटाचे मनोबल वाढावे म्हणून त्यांनी स्वतः काही वस्तू खरेदी केल्या.
यावेळी मनपा उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, मुख्य लेखाधिकारी रावसाहेब कोलगणे, मुख्य स्वच्छता अधिकारी कलीम शेख यांनी सुद्धा याठिकाणी खरेदी करून महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले. सदर केंद्र दिनांक १३ व १४ ऑगस्ट रोजी सुद्धा विक्रीसाठी चालू राहणार आहे. यावेळी उपस्थित नागरिकांनी सुद्धा त्यांना हव्या असणाऱ्या वस्तूची खरेदी केली. यावेळी जनसंपर्क अधिकारी,रुक्मानंद वडगावे, पवन सुरवसे मनपा अधिकारी आणि कर्मचारी व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सदर केंद्र उभारणीस शहर अभियान व्यवस्थापक लक्ष्मण जाधव, नितीन सुरवसे , समुदाय संघटक वीरेंद्र सातपुते, समूह संसाधन व्यक्ती लोमावती मुळे, नीता भालेकर, ज्योती सोनकांबळे, शामल भालेराव, शीतला गोरे व सम्यक व कुंजन महिला बचत गटाचे अध्यक्ष सचिव व सदस्य यांनी परिश्रम घेतले. तरी शहरातील नागरिकांनी या केंद्रावर येऊन उद्या आणि परवा खरेदी करून महिला बचत गटांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन महानगरपालिका आयुक्त श्रीमती मानसी यांनी केले आहे
