• Wed. Oct 15th, 2025

लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

Byjantaadmin

Aug 5, 2025

लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न….

लातूर :- लक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि लातूर या बँकेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार, दि. ०२.०८.२०२५ रोजी अग्रसेन भवन, लातूर येथील सभागृहात उत्साहात संपन्न झाली.सभेपुर्वी सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर यांचेकडून प्राध्यापक श्रीपती येळीकर यांनी सहकार शिक्षण/ प्रशिक्षण कार्यक्रम घेतला. ‌सभेची सुरुवात लक्ष्मीच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून करण्यात आली, तसेच दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
सभेचे अध्यक्ष व बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी सभेचे प्रास्तविक व अहवाल वाचन केले, संयुक्त राष्ट्र महासभेने २०२५ हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष घोषित केले आहे, त्या निमित्ताने सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

अशोक अग्रवाल यांनी मागील काळात बँकेने केलेल्या आर्थिक व सामाजिक कार्याचा अहवाल हा सभागृहासमोर मांडला, ८ % लाभांश जाहीर करताच सभासदांनी टाळाच्या गजरात मान्यता दिली. बँकेने घेतलेल्या जागेवरील बांधकाम हे प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती त्यांनी सभागृहास दिली.

बँकेने मागील वर्षात बोर्ड ऑफ मॅनेजमेंट ची स्थापना बँकेने केल्याचे सभागृहास सांगितले. बँकेने सुरू केलेल्या डिजिटल सुविधा मुळे दररोज १६००० पेक्षा जास्त ऑनलाईन व्यवहार होत आहेत. युपीआय, आयएमपीएस, एटीएम, मोबाईल
बँकिंग अॕप मुळे मध्ये ग्राहकांना व्यवहार करणे सोईचे झाले आहे. मोबाईल बँकिंग व ईतर सुविधेचा लाभ घेण्याचे त्यांनी सभासद व ग्राहकांना आवाहन केले. बँकेला २०२४ चा राष्ट्रीय स्तरावरील बेस्ट डिजीटल पेमेंट बँक हा पुरस्कार मिळाला आहे, तसेच अविज पब्लिकेशन कोल्हापूर यांचेकडून सलग ४ वर्षापासून बँको पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी सर्व संचालक, सभासद, ग्राहक व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

बँकेचे कार्यक्षेत्र हे मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्हे वाढवण्यासाठी भारतीय रिझर्व बँकेला प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर यांनी सभेचे विषय मांडले व उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात विषयांना मान्यता दिली. सभासदांनी विचारलेल्या विविध प्रश्नांचे अशोक अग्रवाल यांनी समाधान केले. स्थानिक शाखा सल्लागार यांचा सत्कार करण्यात आला. बँकेने मोबाईल स्टॕंडीचे उदघाटन करून काही ग्राहकांना मोबाईल स्टॕंडीचे वाटप केले. शाखेतील काही उत्कृष्ट ग्राहकांना भेटवस्तू देऊन सन्मान केला. तसेच बँकेचे अधिकारी, शाखाधिकारी यांना देखील सन्मान चिन्ह देण्यात आले.सभेसाठी बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल, व्हा. चेअरमन सतिष भोसले, संचालक सूर्यप्रकाश धूत, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत सोमाणी, संचालक अजितलाल आळंदकर, सौ. माला भुतडा,सौ. रचना ब्रिजवासी, आशिष अग्रवाल, गणेश हेडडा, विशाल हलवाई, तज्ञ संचालक सीए किशोर भराडिया, सीए राजेश अग्रवाल, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य फुलचंद देशमुख, महिला तक्रार निवारण समिती सदस्या श्रीमती चंद्रकला भार्गव, शाखा सल्लागार जीवनधर शहरकर, अतुल कोटगिरे, बालाजी कोंडावार, डॉ.उदयसिंह मोरे, शिवप्रसाद लडडा, लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन प्रल्हाद दुडिले, व्हा. चेअरमन किशोर बिदादा, सभासद सुरेश धानुरे, हरीकिशन तोष्णीवाल, गोविंद पारिख,चंद्रकांत सुर्यवंशी (पाटील), दिनकर मोरे, बबन सूर्यवंशी, सचिन बजाज,अजय दुडिले, तुळशीराम गंभीरे, विजयकुमार मुक्कावार, पद्माकर मोगरगे,वैभव तळेकर तसेच डॉ. नागोराव बोरगावकर, रविंद्र भुतडा, केतन मलवाड, फकीर अहमद तसेच बँकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर, अधिकारी सुशील जोशी, अनिता कातपुरे,
संतोष बनभेरु, रविंद्र मदने, सुहास राजमाने, महेश मोरे, शिवकुमार राजमाने, शाखाधिकारी सिद्धेश्वर पवार, प्रताप जाधव, राधेशाम देशमुख,मारोती कूकुटलावार, सत्यजित सुर्यवंशी, अनुप सुवर्णकार, अनंत दिक्षित, उमाकांत सुर्यवंशी, तसेच सभासद, ग्राहक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         बँकेचे  व्हा. चेअरमन सतिष भोसले यांनी आभार मानताना बँकेच्या वाटचालीत सर्व संचालक, सभासद, ग्राहक,सहकार क्षेत्रातील अधिकारी, भारतीय रिझर्व बँकेचे अधिकारी,पिग्मी प्रतिनिधी व कर्मचारी यांचा खूप मोठा वाटा असल्याचे नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेणुका नागुरे ( मांडे) व बँकेचे वरिष्ठ अधिकारी सुशिल जोशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *