• Tue. Aug 5th, 2025

दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न करणाऱ्या सरकारला जनता जाब विचारणार- माजी आमदार धिरज विलासराव देशमुख

Byjantaadmin

Aug 5, 2025

दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न करणाऱ्या सरकारला जनता जाब विचारणार- माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे प्रतिपादन

टाका :– राज्य सरकारने निवडणूकांमध्ये मोठ मोठी आश्वासने दिली होती. सत्ता स्थापन झाल्यावर त्या आश्वासनांचे पुढे काय झाले असा प्रश्न जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. त्यामुळे आपल्या प्रश्नांविषयी कानडोळा करणा-या सरकारला जनता नक्कीच जाब विचारणार असे प्रतिपादन माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

लातूर ग्रामीण मधील टाका येथे आयोजित संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव, संचालिका स्वयंप्रभा पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण लोखंडे,संत शिरोमणीचे चेअरमन शाम भोसले, व्हा चेअरमन सचिन पाटील,माजी चेअरमन गणपतराव बाजूळगे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव,मांजरा कारखाना व्हा चेअरमन अशोकराव काळे, रेणाचे व्हा चेअरमन प्रविण पाटील, सदाशिव कदम, बाबासाहेब गायकवाड, पृथ्वीराज सिरसाठ, रघुनाथ शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

पुढे बोलताना ते म्हणाले की,काँग्रेस पक्षाने केली नेहमीच जनतेच्या प्रश्नाला डोळ्यासमोर ठेवून आवाज उठवला आहे. लोकशाही मध्ये जनमताचा आदर हा प्रत्येकाने राखणे गरजेचे आहे मात्र विद्यमान सरकार तसे करताना दिसत नाही. शेतकरी कर्ज माफी करू असे सांगून त्या आश्वासनाचा साधा उल्लेख देखील केला जात नाही, लाडक्या बहिणींना २१०० रू देवू असे सांगितले मात्र त्यात देखील काही झाले नाही, शेतक-यांनी पिकवलेल्या मालास हमीभाव देवू असे सांगितले मात्र त्याचा देखील विसर सरकारला पडला आहे. हे सरकार जनहिताचे नसून या सरकारला जाब विचारायला हवा. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत राज्यातील जनता जाब विचारून धडा शिकवण्यासाठी आतूर असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *