मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा 321 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला.
निलंग:- मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा 321 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. निलंगा (लोकमत न्यूज नेटवर्क) मराठा आरक्षणाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्य रक्तदानाचे आयोजन केले.या वेळी ३२१ रक्तदात्यांनी रक्तदान देऊन सहभाग नोंदवला. या रक्तदानाची उद्घाटन अमरदीप पवार,प्रमोद राजे, अविनाश घोरपडे, ओम प्रकाश माडीबोने, तानाजी बिराजदार, भागवत सूर्यवंशी, सतीश भदरगे अदी रक्त प्रथमता रक्तदान करून शिबिराचे उद्घाटन केले. यावेळी अखिल भारतीय काँग्रेसचे ग्रामीण लातूर जिल्हाध्यक्ष अभय सोळुंके, लातूर जिल्हा काँग्रेस डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अरविंद भातंबरे,संभाजी सेनेचे प्रदेश प्रवक्ते राजकुमार साळुंके, जिल्हाध्यक्ष बबन राजे, माजी जि प अध्यक्ष पंडित धुमाळ, पंचायत समिती माजी सभापती अजित माने, डॉ.मन्मत गताटे,दापका ग्रामपंचायत पॅनल प्रमुख लाला पटेल, विनायक बगदुरे, अंबादास जाधव, अँड तिरुपती शिंदे, नयन माने, शिवसेनेचे ईश्वर पाटील, सुधीर पाटील, स्वराज्य सेवा संस्थेचे अध्यक्ष दत्ता शाहीर, सकल मराठा समाजाचे किरण पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य महेश देशमुख, प्रकाश गोमसाळे, भगवान जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रसिद्धी प्रमुख विनोद सोनवणे विधीज्ञ बार असोसिएशन, एसटी कर्मचारी, भारतीय आयुर्विमा महामंडळ कार्यालय, पंचायत समिती, तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदवला. हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशाल जोळदापके, सतीश फट्टे, प्रदीप कदम, माधव पिठले, शिवाजी शिंदे, शिवाजी देशमुख, राहुल बिराजदार, माधव वाडीकर, धीरज शिंदे, राजेश माने, संजीव आकडे, सचिन पवार, रमेश सातपुते, दिगंबर पवार, श्रीकांत जाधव, यावेळी भालचंद्र ब्लड सेंटर लातूरचे कर्मचारी दिगंबर पवार (जनसंपर्क अधिकारी) ,किशोर पवार ,सुनिल जहागीरदार ,संतोष पाटील ,फरहान शेख ,अरूण कासले ,सौ. हजारे ,अन्सार शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले.
