३२०० झाडांचा वाढदिवस उत्साहात साजरा… मैत्री दिनानिमित्ताने वृक्षारोपण.
झाडांचा वाढदिवस तोही चौथा वाढदिवस, एक नाही दोन नाही तीन नाही तेही 3200 झाडांचा वाढदिवस. पाच वर्ष अपार कष्ट घेऊन, प्रचंड मेहनत करून, सांघिक कार्य करून घेऊन रोपांचे वृक्षात रूपांतर करून झाडांचा चौथा वाढदिवस साजरा करण्यात आला. जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे वसाहत येथील दीड एक्कर जागेवर आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन सदस्यांनी ३२०० झाडांचा घनदाट वन प्रकल्प उभा केला आहे. द नॅचरल ऑक्सिजन फॅक्टरी असे नाव असलेल्या घनदाट वन प्रकल्पात ११० विविध प्रजातींची झाडे आहेत. मागील पाच वर्षात सातत्याने केलेल्या संगोपन कार्यामुळे झाडांची पूर्ण वाढ झाली आहे, या झाडांमुळे परिसरात पोपट, कावळे, भारद्वाज, खारुताई यांची संख्या व घरटे वाढले आहेत. कित्येक झाडांवर मधमाश्यांचे पोळे दिसून येत आहेत, असंख्य फुलपाखरे दिसून येत आहेत.आज झालेल्या या कार्यक्रमाकरिता लातूर महानगर पालिकाच्या सन्मानीय आयुक्त सौ. मानसी मीना यांच्या सह शहरातील विविध संघटनेचे वृक्षप्रेमी नागरिक उपस्थित होते.परिसरातील सर्व झाडांना फुगे, भिंगरी, रिबीन, रंगबिरंगी झिरमिळी लावून सजवण्यात आले होते. फुलांच्या रांगोळ्या काढण्यात आल्या. आयुक्त मॅडम यांच्या हस्ते २०२१ मध्ये लावलेल्या झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. जागतिक मैत्री दिवस निमित्ताने व श्रावण महिना निमित्ताने बेल वृक्ष लावण्यात आले. यावेळी आयुक्त मानसी मीना यांना ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन तर्फे लातूर जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती डॉ. पवन लड्डा यांनी दिली. आयुक्त मॅडम यांना इको ब्रिक्स, चिमणी घरटी,कापडी पिशवी, शमीचे झाड, तुळस बी पुड्या, तुळशी बिया राख्या भेट देण्यात आले.राजनंदिनी व राजलक्ष्मी या मुलींनी आयुक्त मॅडम यांना जागतिक मैत्री दिनानिमित्ताने मैत्रीचा धागा बांधून वृक्षांसोबत सोबत मैत्री दृढ करण्याची विनंती केली.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. भास्करराव बोरगावकर यांनी केले.या वेळी मनपा आयुक्त मानसी मीना यांनी शहरात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य मिळत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. भविष्यातील शहरातील सामाजिक संघटनांना सोबत घेऊन कार्य केले जाईल असे आश्वासन आयुक्तांनी दिलं.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र चाटे यांनी केलं मनोज पांचाळ यांनी आभार व्यक्त केले.
झाडांचा वाढदिवस व झाडांचे जंगल पाहण्यासाठी लातूर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार जयप्रकाश दगडे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव नरहरे, श्वेता लोंढे, रोटरी क्लब सॅटॅलाइटच्या नूतन अध्यक्ष कौशल्या सोनकवडे, समर्पण फाउंडेशनचे राजेश मित्तल, सुप्रभात ग्रुप, मॉर्निंग वॉक ग्रुपचे सर्व सभासद, लीनेस क्लब, इनरव्हील क्लब सदस्या, शिवराज मिसाळ, सौ. उषा शिंदे, सौ. सुनीता बोरगावकर, सौ, अन्नपूर्णा बोरगावकर, रोटरी क्लब, लायन्स क्लबचे सदस्य, सायबर क्राइम नांदेडचे पोलिस अधिकारी दयानंद पाटील, ज्येष्ठ पशुवैद्यक डॉ. महादेव जगताप, डॉ. अशोकराव कदम, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. बी. आर. पाटील, रमेश चिल्ले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन सोबत सध्या साठ संस्था संलग्न झालेल्या आहेत.सलग, अखंड, २२५६ व्या दिवशी संपन्न झालेल्या कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाऊंडेशन च्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.
