• Mon. Aug 4th, 2025

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी मुदतवाढ

Byjantaadmin

Aug 4, 2025

·         १४ ऑगस्ट पर्यंत सादर करता येणार प्रस्ताव

·         कर्जदार शेतकऱ्यांना ३० ऑगस्टपर्यंत मुदत

लातूर, दि. ४ : खरीप हंगाम २०२५ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये राबविली जात आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2025 होती. परंतु, लातूर जिल्ह्यात कमी सहभाग, ॲग्रिस्टॅक फार्मर आयडीची कमतरता, पीएमएफबीवाय पोर्टल आणि आधार (युआयडी) तसेच सीएससी सर्व्हरमधील तांत्रिक अडचणी आणि भूमी अभिलेख पोर्टलच्या समस्यांमुळे शेतकऱ्यांच्या सहभागावर परिणाम झाला आहे.

यामुळे केंद्र शासनाने विशेष बाब म्हणून बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी 14 ऑगस्ट 2025 आणि कर्जदार शेतकऱ्यांसाठी 30 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.  तरी सर्व शेतकऱ्यांनी https://pmfby.gov.in या पोर्टलवर स्वतः, तसेच बँक, विमा कंपनीचे एजेंट, क्रॉप इन्शुरन्स अॅप किंवा सामुदायिक सेवा केंद्र (सीएससी) मार्फत योजनेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवसांब लाडके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *