लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाटचालीत विविध कार्यकारी संस्थांचे मोठे योगदान
लातूर :– देशभरात लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा गौरव केला जातो. यामध्ये लातूर जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांचे योगदान लाख मोलाचे असल्याचे गौरउदगार माजी आमदार तथा लातूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी काढले.
दि महाराष्ट्र बँक्स असोसिएशन द्वारा दिला जाणारा कै.वेकूंठभाई मेहता उत्कृष्ट बँक पुरस्कार व सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल धिरज विलासराव देशमुख यांना पुरस्कार प्राप्त झाला या बद्दल औसा तालुक्यातील विविध कार्यकारी संस्था चेअरमन यांच्या वतीने आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी जिल्हा बँक संचालिका स्वयंप्रभा पाटील,माजी जिप सदस्य नारायण लोखंडे,संत शिरोमणी कारखाना चेअरमन शाम भोसले,व्हा चेअरमन सचिन पाटील,माजी चेअरमन गणपतराव बाजूळगे, जिल्हा बँक उपाध्यक्ष प्रमोद जाधव,मांजरा कारखाना व्हा चेअरमन अशोकराव काळे,रेणा कारखाना व्हा चेअरमन प्रविण पाटील, सदाशिव कदम,बाबासाहेब गायकवाड,पृथ्वीराज सिरसाठ,रघुनाथ शिंदे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना माजी आमदार धिरज विलासराव देशमुख म्हणाले की, लातूर जिल्हा बँक ही आपल्या जिल्ह्यातील शेतक-यांचा मोठा आधार असून शेतकरी आहे म्हणून देश आहे त्यामुळे शेतकरी हिताचे अनेक निर्णय घेवून ते यशस्वी पणे राबवले त्यामुळे आपल्या भागातील शेतक-यांच्या जिवनात आर्थिक परिवर्तन घडले आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी सर्व विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन व सदस्यांनी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासा विविध संस्था चेअरमन दत्तकुमार शिंदे,वाघंबर कांबळे,गोरख सावंत,दिनकर मेढकर,गुणवंत कदम,धनराज साळुंखे,दिलीप पाटील,अशोक जंगाले,गुणवंत करडे,पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
