लातूर प्रतिनिधी
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई येथे होणाऱ्या २९ ऑगस्टच्या नियोजित उपोषणास मोठ्या संख्येत जाण्याचा निर्धार लातूर जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने केला असून यांसदर्भात रविवारी (दि.३) येथे घेण्यात आलेल्या सकल मराठा समाजाच्या
नियोजन बैठकीत ही माहिती देण्यात आली. या बैठकीत मुंबई येथे जाण्याबाबत विस्ताराने चर्चा करण्यात आली.लातूर येथील रुक्मिणी मंगल कार्यालयात झालेल्या या बैठकीत मोठ्यासंख्येत लातूर शहरासह तालूके तसेच ग्रामिण भागातून मोठ्या संख्येत मराठा सेवक आले होते. मराठा आरक्षणासाठी मुंबई गाठायची असा निर्धार करीत आरक्षण मिळेपर्यंत लढा द्यायचा असा संकल्प यावेळी करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास राज्यभरातील मराठा समाज बांधव लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यात लातूर जिल्याचा सहभाग ठळक व कृतीशिल रुपात असेल व तो सर्वांना दिसेल असे यावेळी सांगण्यात आले. यासाठी यापक नियोजन सुरू असून बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीतप्रत्येक तालुक्यात बैठका घेणे, चावडी बैठकांवर भर देणे, आंदोलना बाबत व्यापक जनजागृती करणे, प्रवासाचे नियोजन करणे, याबाबत सविस्तर चर्चाकरण्यात आली. मुंबई येथील आंदोलनात मोठ्या संख्येने समाज बांधवांनीसहभागी होण्याचे आवाहनही यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.बैठकीच्या प्रारंभी क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांना त्यांच्या जयंती निमित्त सकल मराठा समाजाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या बैठकीस लातूर जिल्ह्यातील मराठा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मुंबई येथेजाताना वाहनांवर लावण्यासाठी तयार करण्यात आलेल्या स्टिकरचे वाटप करण्यात आले.
……………
मुंबई येथील हे नियोजित उपोषणात समाजाचा सहभाग लक्षवेधी असेल. त्यात युवक, महिला, सर्व वयोगटातील समाजबांधव व भगिणी मोठ्या संख्येत सहभागी होणार आहेत. आरक्षणाअभावी समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांनी हतबलतेने मरणाला कवटाळले आहे, त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण अत्यंत गरजेचे असून ते मिळवायचेच असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
