• Mon. Aug 4th, 2025

…अन्यथा डेप्युटी कलेक्टर कचेरीच्या आवारात  अंतिमसंस्कार करणार-भीम आर्मीचा इशारा 

Byjantaadmin

Aug 4, 2025

…अन्यथा डेप्युटी कलेक्टर कचेरीच्या आवारात  अंतिमसंस्कार करणार-भीम आर्मीचा इशारा 

निलंगा,

मौजे पालापूर ता. निलंगा जिल्हा लातूर येथील बौद्ध आणि मातंग समाजासाठी तात्काळ  स्मशानभूमी  उपलब्ध करून  देण्याच्या  मागणीचे निवेदन भीम आर्मी सामाजिक  संघटनेच्या वतीने डेप्युटी कलेक्टर निलंगा यांना देण्यात आले आहे.दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,निलंग्याचे विद्यमानतहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना यासंदर्भात दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी स्मशानभूमीसाठीच्या अडचणी संदर्भात मागण्याचे लेखी स्वरूपात कळविण्यात आले होते.मात्र या विषयाकडे  तहसीलदार निलंगा यांनी अद्यापपर्यंत  कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही उलट त्यांनी या ज्वलंत प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे मौजे  पालापूर येथील बौद्ध ,मातंग समाजाच्या  स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.  या गावात मागील ७० वर्षापेक्षा अधिक काळापासून येथील बौद्ध ,मातंग  वस्तीतील  व्यक्तीचा मृत्यू  झाल्यानंतर येथील एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये अंत्यसंस्कार  करण्यात येत होतेमात्र या शेतकऱ्यांनी  यापुढे त्यांच्या  शेतामध्ये अंतिमसंस्कार करण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे येथील वस्तीतील व्यक्तीचा मृत्यू झालाच तर  त्यांच्या पार्थिव देहावर  अंतिमसंस्कार कोठे करायचा हा मोठा यक्ष प्रश्न बौद्ध,मातंग  समाजासमोर आ  वासून उभा आहे

निवेदनात पुढे असेही नमूद करण्यात आले की,या वस्तीमधील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या वक्तीच्या पार्थिव देहावर मिळेल त्या ठिकाणी रस्त्याच्या बाजूला कुठेही जागा मिळेल तिथे अंतिम संस्कार करावा लागत आहे. त्यामुळे मयत प्रेताची विटंबना होत आहे.या विषयी भीम आर्मी या सामाजिक  संघटनेनी गंभीर दखल घेतली असून तालुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे यांनी सदरील गावी भेट देऊन स्मशान भूमी संदर्भात स्थानिक समाज बांधवांशी चर्चा करून क्षणाचाही विलंब न करता थेट 

उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांची भेट घेऊन लेखी निवेदन देऊन तत्काळ प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या मागणीचे निवेदन देऊन स्मशानभूमीचा प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावा अशी मागणी केली.जर हा विषय सोडवला गेला नाही तर यापुढे मयताचे प्रेत उपविभागीय अधिकारी  कार्यालयात आणून कार्यालयाच्या आवारात  अंतिमसंस्कार करण्याचा  इशारा दिला आहे.निवेदनावर भीम आर्मीचे  तालुकाध्यक्ष अतुल सोनकांबळे,राज लोखंडे,शुभम सूर्यवंशी,दिगंबर सूर्यवंशी,अनिल कांबळे,अनिल सुरवसे, किशोर सुरवसे, निखिल कांबळे, इत्यादीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *