अरविंद पाटील निलंगेकर यांच्या हस्ते औराद शहा.बोरसुरी, सावरी मंडळातील नवनियुक्ती पदाधिकाऱ्यांना नियुक्तपत्र वाटप!
निलंगा : तालुक्यातील औराद शहाजानी येथील भाजपाची नूतन कार्यकारिणी बुधवारी दि. 30 जुलै रोजी जाहीर करण्यात आले. भाजपा युवा नेते तथा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील कन्हैया पाटील यांच्या निवासस्थानी पार पडलेल्या बैठकीमध्ये सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांच्या शुभ हस्ते औराद मंडळ अध्यक्ष अनिल भंडारे, युवा मोर्चा अध्यक्ष कन्हैया पाटील नियुक्तपत्र देण्यात आले व सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अरविंद पाटील निलंगेकर यांनी अभिनंदनकरून पुढील वाटचालीसाठी सर्वांना शुभेच्छा दिले.
तसेच यावेळी निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी मंडळातील अंबुलगा बु., औराद शहाजानी, हलगरा या गटातील सर्व पदाधिकारी बांधवांची व महिला भगिनींची आढावा बैठक घेतले. पक्षाची विचारधारा व धोरणे समजावून सांगत भागातील विविध प्रश्न, संघटनात्मक कार्य व आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वांना मिळून कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी केले. याप्रसंगी संजय दोरवे, दगडू सोळुंके, भाजपा तालुकाध्यक्ष कुमोद लोभे, औराद शहाजानी मंडळ अध्यक्ष अनिल भंडारे, शिवपुत्र आग्रे, बंकट बिरादार व नुतन पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
