मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकल्प…
निलंगा प्रतिनिधी :- मराठा आरक्षण आंदोलनाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकल मराठा समाजाच्या वतीने शुक्रवार दि.१ ऑगष्ट रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक निलंगा येथे भव्य विक्रमी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रक्त मिळावे व अनेकांचे जीव वाचले पाहिजेत हा उद्देश समोर ठेऊन हा संकल्प करण्यात आला आहे तरी तालुक्यातील तमाम समाज बांधवांनी रक्तदान शिबिरात रक्तदान करून सहकार्य करावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
