विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारने राबविलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ‘ योजनेतील तब्बल 26 लाख 34 हजार जणी विविध कारणांनी अपात्र ठरल्याचं जाहीर केल्यानंतर या योजनेत काही ठिकाणी पुरुषांनी अर्ज केल्याच्या बाबी निदर्शनास आल्या . महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी हे सांगितल्यानंतर राजकीय वर्तुळातून सरकारवर जोरदार टीका होत आहे .राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी यावरून सरकारला फटकारलंय. लाडकी बहीण योजनेत 4800 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आराेप खा. सुप्रिया सुळे यांनी केला.
पुरुष लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे गेलेच कसे ? असा सवाल त्यांनी केलाय . पीक विमा भरताना शेतकऱ्याचा फॉर्म रिजेक्ट होतो स्कॉलरशिपमध्ये विद्यार्थ्यांचा तर आयुषमान योजनेत रुग्णाचा फॉर्म रिजेक्ट होतो मग लाडकी बहीण योजनेत पुरुषांचे फॉर्म रिजेक्ट कसे झाले नाहीत? लाडकी बहीणच्या गैरव्यवहारावर खासदार सुप्रिया सुळेंनी सवाल केले आहेत.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
‘निवडणुकांच्या बरोबर तीन महिने आधी लाडकी बहीण योजनेत आत्ता रिजेक्ट केलेले फॉर्म तेंव्हा का नाही झाले? हा स्कॅम नाही तर काय आहे ? शिक्षण आरोग्य आणि महिलांच्या इतर योजनांना सरकारने कट दिला आहे .हे खुद्द महाराष्ट्र सरकारने कबूल केला आहे . लाडकी बहीण योजनेमुळे सरकारचा तिजोरीवर लोड आला त्यामुळे इतर योजनांना हा कट दिल्याचं सरकारनं म्हटलं . ‘ सरकारने बहिणीला पैसे दिले ..आनंद आहे .पण त्याच्या आता जर भ्रष्टाचार होणार असेल -तोही छोटा मोठा नाही 4800 रुपयांचा घोटाळा हा या योजनेत पहिल्या टप्प्यात झालेला आहे .अजून किती नाव वगळतील ? स्कीमचं काय होईल हे माहित नाही . पण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती गंभीर आहे . हे राज्यातील अनेक मंत्र्यांच्या वक्तव्यांवरून माध्यमांमध्ये आला आहे . सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून सगळंच स्पष्ट होत आहे . त्यामुळे महाराष्ट्र सरकारला मी विनंती करते की या प्रकरणावर SIT बसवा अशी मागणीही खा. सुप्रिया सुळे यांनी केली.
लाडकी बहिण योजनेत सॉफ्टवेअरपासून घोटाळा: सुप्रिया सुळे
‘लाडकी बहीण योजनेत फॉर्म कोणी भरून घेतले ? कसे भरून घेतले ? लाडक्या बहिणीच्या सॉफ्टवेअरने अपात्र फॉर्म आधीच रिजेक्ट का केले नाहीत ? कोणतं सॉफ्टवेअर होतं ? लाडकी बहीण योजनेत सॉफ्टवेअर पासूनच झालेला हा घोटाळा आहे .हा छोटा मोठा घोटाळा नाही .याचे उत्तर सरकारला द्यावच लागेल .या घोटाळ्याला सरकार जबाबदार आहे . याचे उत्तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना द्यावंच लागेल असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या .हा राज्यातला विषय आहे .त्यामुळे सरकारने आम्हाला या घोटाळ्याचे पेपर ऑडिट आणि तपास पारदर्शकपणे द्यावेत . 4800 कोटी रुपयांचा घोटाळा झालाय . जर सरकारने दाद दिली नाही तर मी केंद्रात संसदेत हा विषय पुढे रेटणार असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले .