• Sun. Aug 3rd, 2025

लातूर शहरात फ्रंटशिट घेणाऱ्या व गणवेष परिधान न करणाऱ्या बेशिस्त ऑटोरिक्षा चालका विरूध्द विशेष मोहिम

Byjantaadmin

Jul 29, 2025

लातूर शहरात फ्रंटशिट घेणाऱ्या व गणवेष परिधान न करणाऱ्या बेशिस्त ऑटोरिक्षा चालका विरूध्द विशेष मोहिम लातूर (प्रतिनिधी ):-   याबाबत अधिक माहिती अशी की, लातूर शहरात ऑटो रिक्षाची  संख्या जास्त असुन त्यात ऑटोरिक्षा चालक सर्रासपणे वाहतुक नियमांचे उल्लंघन करीत आहेत. रिक्षामध्ये चालकाचे बाजुस फ्रंटशिटला प्रवासी घेणे, गणवेष परिधान न करणे, शहरात रोडवर बेशिस्त पणे कोठेही थांबून प्रवासी चढ-उतार करणे, चौका-चौकांमध्ये वळणावर प्रवासी घेण्यासाठी ऑटो रिक्षाची दुहेरी रांग करुन थांबवणे इत्यादीमुळे सामान्य नागरिकांना विनाकारण रहदारीस अडचण निर्माण होवून त्रास होत असल्याच्या तक्रारी येत असल्याने, फ्रंटशिट घेण्याऱ्या, गणवेश परिधान न करणाऱ्या, अशा बेशिस्त ऑटो चालकावर मोटार वाहन अधिनियमान्वये कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधिक्षक,मंगेश चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी,  (लातूर शहर) रणजीत सावंत, यांचे मार्गदर्शनाखाली वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक बुद्धीराज सुकाळे यांचे नेतृत्वात विशेष मोहिम राबविण्यात येत आहे यात

1) बेशिस्त पणे फ्रंटशिट घेणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर दररोज 20-25 केसेस केल्या जात असुन त्यांचेकडून फ्रंटशिटचे दंडासह मागील संपुर्ण अनपेड दंड जमा करून घेण्यात येत आहे.

2) गणवेष परिधान न करणाऱ्या ऑटो रिक्षा चालकांवरही कडक कार्यवाही चालू असून 368 ऑटो चालकावर केसेस करण्यात आल्या असुन 3,30,300/-रुपये दंड आकारण्यात आला आहे. यापुढेही मोहिम चालू आहे.

३) पेट्रोल ऑटोरिक्षामध्ये अनाधिकृतपणे बदल करुन विना परवाना एलपीजी किट बसवणाऱ्या ऑटो रिक्षा चालकावर गुन्हे दाखल करण्यात आले असुन यापुढे विना परवाना एलपीजी किट बसविणारे ऑटोरिक्षावर विशेष मोहिम राबवून गुन्हे दाखल येणार आहेत

ऑटो रिक्षा मध्ये फ्रंटशिट प्रवासी घेण्यावर, गणवेष परिधान न करणारेवर, विना परवाना एलपीजी किट बसविणारेवर, चौकामध्ये 50 मिटर अंतराचे आत थांबणारेवर व कोठेही थांबून बेशिस्तपणे प्रवासी चढ-उतार करणारेवर आळा घालण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात लातूर पोलीस व वाहतुक नियंत्रण शाखेचे पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचेकडून कडक कार्यवाही करण्याची मोहिम चालू असुन लातूर शहरातील सर्व ऑटो रिक्षा मालक व चालक यांनी 1) फ्रंटशिट प्रवासी घेवू नये 2) गणवेष परिधान करावा 3) ऑटो रिक्षा थांब्यावरच शिस्तीत थांबून प्रवासी चढ-उतार करावेत 4) मुख्य चौकांमध्ये 50 मिटर आत नो स्टॉपिंग/नो पार्किंगचे पालन करण्याबाबत लातूर जिल्हा पोलीस दलातर्फे जनतेस अवाहन करण्यात येत आहे. वरील नियमांचे पालन न करणाऱ्या ऑटो चालकांना  दंडात्मक कार्यवाहीस सामोरे जावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *