छावा संघटनेचा पाठिंबा नव्हे तर सोबत लढणार महादेव कोळी समाजाचे प्रश्न सरकारने तत्काळ सोडवावे अखिल भारतीय छावा संघटनेचे घाडगे यांचा इशारा

निलंगा,: मराठवाड्यातील महादेव कोळी समाजाच्या मागण्यासाठी नुसता पाठिंबा नाही तर त्यांच्या सोबत लढणार राज्य सरकारने तात्काळ प्रश्न मार्गी लावावे अन्यथा छावा आपल्या स्टाईलने आंदोलन करेल असा इशारा अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांनी सोमवारी दि. २८ रोजी दिलासकल आदिवासी समाजाच्या वतीने त्यांच्या विविध मागणीसाठी गेल्या आठ दिवसापासून उपविभागी कार्यालयासमोर अन्नत्याग उपोषण आंदोलन सुरू आहे या उपोषणाला आज त्यांनी भेट देऊन सर्व आंदोलन कर्त्याच्या तब्येतीची विचारपूस केली यावेळी विजयकुमार घाडगे म्हणाले की, राज्य सरकारकडून मराठा समाजाचा प्रश्न अशाच पद्धतीने चिगळवत ठेवला आहे गेल्या 40 वर्षापासून कोळी समाज आपल्या न्याय हक्कासाठी लढतो मात्र सरकारची कोणत्याही समाजाला न्याय द्यायची इच्छा नाही निवडणूक पुरते कुठे आश्वासन देऊन कुठे आश्वासन देऊन सत्तेत येतात दिलेली आश्वासने विसरून जातात तुमचा समाज एकटा नसून तुमच्या सोबत छावा संघटना ताकदीने सोबत लढणार लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावून उपोषण थांबवणे बाबत निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तात्काळ मागणी मान्य नाही झाल्यास भावा संघटना उद्यापासून आंदोलनामध्ये उतरेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी छावा संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.