• Sun. Aug 3rd, 2025

Paytm, PhonePe, GPay वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, 1 ऑगस्टपासून ‘हे’ नियम बदलणार

Byjantaadmin

Jul 28, 2025

1 ऑगस्ट 2025 पासून UPI चे नवे नियम लागू होणार आहेत. तुम्ही नियमितपणे Paytm, PhonePe, GPay किंवा इतर कोणत्याही UPI प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल, तर पुढील महिन्यापासून काय बदल होणार आहेत, हे जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

UPI इकोसिस्टमचे व्यवस्थापन करणारी भारतीय राष्ट्रीय पेमेंट्स महामंडळ (NPCI) प्रणालीवरील ताण कमी करण्यासाठी आणि व्यवहारात होणाऱ्या उशीर व अपयशी व्यवहार यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काही नवीन मर्यादा लागू करणार आहे. या नव्या नियमांनुसार, बॅलन्स तपासणे (Balance Check) आणि स्टेटस रिफ्रेश (Status Refresh) करण्यासंबंधीच्या विनंत्यांवर मर्यादा घालण्यात येणार आहे. त्यामुळे वापरकर्त्यांनी आता या सुविधा वापरताना विचारपूर्वक आणि गरजेनुसारच वापर करावा लागणार आहे.

बॅलन्स तपासण्याची मर्यादा

पुढील महिन्यापासून UPI वापरकर्ते दिवसातून केवळ 50 वेळाच आपले खाते शिल्लक (बॅलन्स) तपासू शकतील. त्याचप्रमाणे, वापरकर्ते आपल्या फोन नंबरशी संबंधित बँक खात्याची माहिती UPI अ‍ॅपवर दिवसात फक्त 25 वेळाच पाहू शकतील. या नवीन मर्यादा गैर-आवश्यक ट्रॅफिक कमी करण्यासाठी निश्चित करण्यात आल्या आहेत, जेणेकरून दिवसभराच्या अधिक वापराच्या काळात सिस्टम स्लो होणार नाही आणि व्यवहारांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. नेटवर्कवरील अनावश्यक लोड कमी झाल्यास, संपूर्ण प्रणाली अधिक वेगवान, कार्यक्षम आणि सुरक्षित पद्धतीने काम करेल.

ऑटोपे व्यवहारांसाठी ठराविक वेळापत्रक लागू

याशिवाय, NPCI आता UPI ऑटोपे व्यवहारांसाठी निश्चित वेळापत्रक (Time Slot) लागू करत आहे. याचा अर्थ असा की, ऑटोपेमेंट्स, सब्स्क्रिप्शन, युटिलिटी बिल्स आणि ईएमआयसारखे आधीच शेड्यूल केलेले व्यवहार दिवसभरात कधीही नव्हे, तर निश्चित वेळांमध्येच प्रक्रिया केले जातील.

आता AutoPay व्यवहार फक्त तीन ठराविक वेळांमध्येच प्रोसेस होतील:

– सकाळी 10 वाजण्यापूर्वी

– दुपारी 1 ते 5 या वेळेत

– रात्री 9:30 नंतर

या वेळापत्रकाबाहेर ऑटोपे व्यवहार प्रक्रिया केले जाणार नाहीत. तर UPI व्यवहार मर्यादांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्या पूर्वीप्रमाणेच कायम राहतील.

ऑगस्ट महिन्यात बँकांना किती दिवस सुट्टी?

दरम्यान, ऑगस्ट महिन्यातील बँक सुट्ट्यांची यादी जाहीर झाली आहे. MAHARASHTRAात ऑगस्ट महिन्यात एकूण 11 दिवस बँका बंद राहण्याची शक्यता आहे. रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, स्वांतत्र्यादिन, गणेशोत्सव आणि इतर सुट्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *