गॅसवितरकाकडून सराफा व्यापाऱ्यास मारहाण
• औराद शहाजानी येथील घटना कारवाईसाठी सराफा, सुवर्णकारांचा पोलिस ठाण्यावर मोर्चा
निलंगा : तालुक्यातील औराद शहाजानी येथील एका सोन्याचांदीच्या व्यापाऱ्यास दि १९ डिसेंबर रोजी गॅसची गाडी दुकानासमोर का लावली अशी विचारणा केली असता गॅसच्या मालकाने सराफ- स लाथा बुक्यासह वायर व सळईने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी गॅस मालकावर कडक कार्यवाई करण्यात यावी, अशी सराफ व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने बुधवारी पोलिस ठाण्यावर मार्चा काढून निवेदन देत निषेध नोंदवत सराफा बाजार बंद ठेवण्यात आला.
निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथील सराफ व्यापारी राजकुमार चंद्रकांत अंबुलगे हे दि १९ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता सोनार कॉम्प्लेक्स जवळ गॅसची गाडी उभी करू नका असे म्हणत सोनार कॉम्प्लेक्ससमोर उभी करण्यात आलेली गॅसची गाडी काढण्याची विनंती केली असता एच पी गॅसचे वितरक बळीराम मोरे यांनी अंबुलगे यांना गॅसच्या वायरने मारहाण करुन गंभीर जखमी केल. या निषेधार्थ दि २१ डिसेंबर रोजी बुधवारी स
राफ बाजार लाईन कडकडीत बंद ठेवत पोलिस ठाण्यावर व्यापारी मूक मोर्चा काढुन संबंधितावर कडक कार्यवाही करून गॅसची गाड़ी सुवर्णकार कॉम्प्लेक्स समोर उभे करण्यास मनाई करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी सुरेश पाटील, शंकर पोतदार, मंगेश डावरगावे, अशोक अंबुलगे, किशोर पाटील, शहाजान नाईकवाडे, बाळु पाटील, पंढरपुरे आदी सुवर्णकार व्यापारी व कामगार उपस्थित होते. याविषयी औराद शहाजानी पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप कामत म्हणाले की, संबंधीताची तक्रार आल्यानंतर एन सी दाखल केली असून अधिक तपास सुरू आहे.