• Sat. May 3rd, 2025

तांबाळा येथे निवडणूक निकालानंतर दगडफेक

Byjantaadmin

Dec 22, 2022

 

तांबाळा येथे निवडणूक निकालानंतर दगडफेक

निलंगा तालुक्यातील : तांबाळा येथील ग्रामपंचायत करुन निवडणुकीचा निकाल दि २० डिसेंबर मंगळवारी रोजी जाहीर झाल्यानंतर गावात विजयी उमेदवार आल्यानंतर गावात दगडफेक झाली. यात एक जखमी व अनेक वाहनाचे नुकसान झाले यासंबंधी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच आरोपीना अट क करण्यात आली आहे.

निलंगा तालुक्यातील तांबाळा येथे ग्रामपंचायत निवडणूक पार पडली याचा निकाल दि २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला यानंतर गावात दगडफेक झाली यातील जखमी फिर्यादी आयुब दस्तगीर शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, निलंगा येथून विजयी उमेदवार ” गावात आल्यानंतर गावातील आरोपी बसवराज संगप्पा पाटील व अन्य १२ साथीदारांनी अचानक दगडफेक करुन दुचाकी व

चारचाकी वाहनांची तोडफोड नुकसान केले. यात जखमी झालो. या दगडफेकीत एक कार, एक जीप, एक बुलेट याचे नुकसान झाले आहे. याविषयी औराद शहाजानी पोलिस ठाण्यात आरोपी बसवराज संगप्पा पाटील व अन्य बारा साथीदारावर कलम १४३, १४७, १४८, १४९, ३२४, ४२७ भादवी १३५ म पो कायद्याप्रयोग गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सदर घटना घडल्या नंतर औराद शहाजानी, कासारसिरसी पोलिस पथक गावात पोहोचले. शिवाय उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून शांतता कमिटीची बैठक रात्री उशिरा सुरू घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *