कासार सिरसी(प्रतिनिधी):-औसा विधानसभेचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या प्रयत्नाला यश अखेर कासार सिरसी – कोराळी व आलमला – उंबडगा रस्त्यांना मंजुरी मिळाली आहे.
केंद्रीय आणि राज्य स्तरावर केलेल्या सातत्यपूर्पु पाठपूराव्याला यश आले असून प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत कासार सिरसी – कोराळीवाडी – कोराळी – राज्य सरहद्द या ७ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ८ कोटी ८० लक्ष, रामा २४२ – आलमला – उंबडगा – प्ररामा ३६१ या ५.५ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ४ कोटी १० लक्ष तसेच राममा ३६१ – गुळखेडा – टाका – मासुर्डी – एकंबी वाडी – जिल्हा सरहद्द या ६.५ किमी लांबीच्या रस्त्यासाठी ६ कोटी ३३ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. ३ अतिशय महत्वाच्या रस्त्यांसाठी एकूण १९ कोटी २३ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून देशाचे कर्तव्यदक्ष पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदीजी, केंद्रीय ग्रामविकास मंत्री गिरीराज सिंह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांचे या भागातील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे. या कामांसाठी लातूरचे खासदार सुधाक शृंगारे यांनीही पाठपुरावा केला होता, त्यांचेही खूप। आभार मानले आहेत
कासार सिरसी – कोराळीवाडी – कोराळी रस्त्याच्या अतिशय दयनीय अवस्थेमुळे त्या भागातील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत होते. आमदार अभिनन्यू पवार यांनी १० ऑगस्ट, २०२१ रोजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री भेट घेऊन तसेच या विषयासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनेकवेळा भेट घेऊन पाठपुरावा केला होता. अखेर हा रस्ता मंजूर झाला याचा मनस्वी आनंद आहे. रामा २४२ – आलमला – उंबडगा या रस्त्याचा सुद्धा विषय मार्गी लागला असून या रस्त्यावरील पूल बांधकामाचा सुमारे २ कोटींचा प्रस्ताव सुद्धा मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे.