जुन्नरचे आमदार शरद सोनवने यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन…
निलंगा (अयुब बागवान):- बेडर – बेरड रामोशी आणि पारधी समाजाबद्दल आपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी जुन्नर मतदार संघाचे आमदारशरद सोनवणे यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल कासारसिरसी तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे पारधी समाज बेडर – बेरड रामोशी समाजाच्या वतीने रस्त्यावर उतरून निषेध मोर्चा काढून निषेध व्यक्त करीत त्यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करण्यात आले.
यावेळी आ.शरद सोनवणे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन कासारसिरसी येथील पोलिस निरीक्षक प्रताप गर्जे यांच्याकडे देण्यात आले.यावेळी जय मल्हार क्रांती संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष भास्कर पाटील, राज्य सरचिटणीस बालाजी मिलगिरे, मराठवाडा युवा प्रमुख मंगेश जमादार, वाडी कासार सिरसीचे सरपंच महेश मंडले,औसा तालुका युवक अध्यक्ष रायाप्पा मंडले, निलंगा तालुका अध्यक्ष सायबा कानडे, युवक प्रमुख बालाजी फुगाके, कायदेशीर सल्लागार ॲड.दत्तात्रय घोसले, नामदेव मंडले, बाळाप्पा गुंजले पिराजी मिलगिरे, मारुती पाटील, लहू रेवणे,मेघराज भोसले, लक्ष्मण ममाळे, दयानंद रेवणे, दिलीप भोसले, संतोष पाटील, सिद्धार्थ पोगाके, दत्ता पोगाके इत्यादीसह समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
