• Sun. Aug 3rd, 2025

वामनराव  शिंदे झरिकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न

Byjantaadmin

Jul 28, 2025

वामनराव  शिंदे झरिकर यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न…

निलंगा (प्रतिनिधी)

मागील अनेक वर्षापासून निलंगा तालुक्यातील  काटेजवळगा  या गावात  शिक्षक म्हणून कर्तव्य बजावून  शैक्षणिक कार्याची धडपड असणारे मनमिळावू  सर्वांना हवे असणारे विद्यार्थी प्रिय शिस्तबद्ध गुरुजी आयु. वामनराव माधवराव शिंदे (मामा) सर हे प्रदीर्घ  सेवा बजावून तब्बल ३५ वर्षें ०२ महिने ११ दिवस कर्तव्य बजावून     दिनांक ३१ जुलै २०२५ रोजी काटेजवळगा  येथून सेवानिवृत्त होत आहेत.

त्यांच्या सेवापूर्ती सोहळ्याचे  आयोजन दिनांक २५ जुलै २०२५ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा काटेजवळगा या शाळेच्या प्रांगणात  आयोजित करण्यात आला होता. या सेवापुर्ती सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सुधाकर येडले हे होते.याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक नेते शिवाजीराव साखरे (वाघ),वनराईचे काँब्रेड उत्तम.शिंदे ॲड.नारायण सोमवंशी, कॉस्ट्राईबचे जी. टी  होसुरकर,शिवाजीराव पाटील(मंत्री दादा),कॉस्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष नागसेन कांबळे,शिक्षक सोसायटीचे चेअरमन आनंद जाधव ,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष अप्पाराव शिंदे,सेवानिवृत्त विस्तार अधिकारी संजय    सूर्यवंशी(माकणीकर),शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण सोळुंके,गटशिक्षण अधिकारी सुरेश गायकवाड,सरपंच शरद सोमवंशी, सामाजिक कार्यकर्ते दादाराव कांबळे  हे होते.

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर पाटील (झरिकर) केंद्र प्रमुख  एस.बी.तेलंग,गुंडुरे डी बी ,माजी सरपंच कालिदास रेड्डी,मुख्याध्यापक गिरीसर ,प्रवीण सूर्यवंशी सर , डोंगरे मॅडम ,बी डी जाधव, मुधाळे मॅडम,आकडे मॅडम, माजी मुख्याध्यापक उद्धव दोरवे, दिपक देशमुख,जेष्ठ संपादक मोहन क्षिरसागर,पत्रकार मिलिंद कांबळे ,सिद्धेश्वर माने,मधुकर गुरुजी,कालिदास बिरादार ,गोविंद साळुंके, अनिरुध्द जंगापल्ले इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक गिरी सर  यांनी केले तर सूत्रसंचालन प्रवीण सूर्यवंशी सर  यांनी केले. यावेळी इयत्ता ६ वी वर्गात शिक्षण घेत  असलेली स्वराली माधव  पौळकर  या विद्यार्थिनीने शिंदे सरांच्या कार्यावर आपले मनोगत व्यक्त केले..उपस्थित असलेल्या अनेक प्रमुख वक्त्यांनी वामनराव शिंदे सरांच्या कार्याचा गुणगौरव केला.यावेळी विविध शिक्षक ,संघटनेचे पदाधिकारी नातेवाईक,आप्तेष्ट  मित्र परिवार गावकरी विद्यार्थी,विद्यार्थिनी पत्रकार यांची लक्षणीय उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *