• Sun. Aug 3rd, 2025

मांजरा परिवारातील संस्थांचे कार्य समाजभिमुख- शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे प्रतिपादन

Byjantaadmin

Jul 28, 2025

मांजरा परिवारातील संस्थांचे कार्य समाजभिमुख- शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचे प्रतिपादन

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांचा आशियाना निवासस्थानी सत्कार 

लातूर ;-राज्यातील सहकारी साखर कारखानदारीत लातूरच्या मांजरा परिवाराने एक वेगळेपण टिकवले असून परिवाराने कारखानदारी असो की सहकारी संस्था असो त्यात समाज भिमुख कार्य करण्याचा प्रयत्न माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्याकडून झालेला आहे त्याबद्दल मांजरा साखर परिवाराचे कौतुक करत हा आदर्श राज्यांतील साखर कारखानदारानी घ्यावा असे आवाहन क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांतजी तूपकर यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते रविवारी लातूर दौऱ्यावर आले असताना राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या आशियाना निवासस्थानी भेट दिली त्यानंतर दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात त्यावेळीं ते बोलत होते 

सहकार क्षेत्रात मांजरा परिवारातील संस्था अव्वल स्थानावर

यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख यांनी मांजरा साखर परिवारातील साखर उद्योग तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून विविध कर्ज योजना, शेतकऱ्यासाठी ५ लाख रुपयांची बीन व्याजी योजना राबवून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे काम जिल्हा बँकेने केले याबाबत माहिती दिली तसेच उसाला मराठवाडा विभागात सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न मांजरा परिवाराने अग्रेसर असलेला परिवार आहे शेतकरी हा केंद्रंबिंदू समोर ठेवून कार्य करत असल्याचे सांगून देशात लातूर बँक ही पाच लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्जे देणारी पहिली आहे त्यामुळें परिवारातील सर्व संस्था अव्वल स्थानावर राहिलेल्या आहेत.यावेळी राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील, क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजू कसबे, प्रवक्ते  सत्तार पाटील प्रवक्ते राजेन्द्र मोरे क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुणदादा कुलकर्णी,युवा आघाडीचे प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण मोरे किसान आर्मी चे श्रीराम चलवाड, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, माध्यम समन्वयक हरिराम कुलकर्णी यांच्या सह राज्यातील क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *