• Sun. Aug 3rd, 2025

एकनाथ  शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि दमदार अमलबजावणी मुळे महाराष्ट्राचा विकास झपाट्याने  आमदार डॉ. राजन साळवी

Byjantaadmin

Jul 28, 2025

एकनाथ  शिंदे यांच्या उत्कृष्ट नियोजन आणि दमदार अमलबजावणी मुळे महाराष्ट्राचा विकास झपाट्याने  आमदार डॉ. राजन साळवी

निलंगा:- लातूर जिल्ह्यातील निलंगा, औसा, देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील शिवसेना प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला मार्गदर्शन करत असताना शिवसेनेचे समन्वयक आमदार डॉ. राजन साळवी म्हणाले की महाराष्ट्र राज्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून घेतलेले जे काही निर्णय होते ते सगळे निर्णय महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारे तर होतेच होते परंतु महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाला भावनारे निर्णय होते. शिंदे यांनी घेतलेले कष्ट जनते प्रती असणारी प्रामाणिक भावना आणि सर्वांगीण विकासासाठी केलेले अचूक असे नियोजन नियोजनाची शतप्रतिशत अमलबजावणी यामुळेच महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीचे सरकार पुन्हा एकदा निवडून दिले. त्या शिंदे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक सदस्य व सक्रिय सदस्य मोहीम व्यवस्थित पद्धतीने राबवून लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूत रुजवावी व येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. शिवसैनिकाच्या सर्व भावना काही प्रमाणात होत असलेली अडचण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी समन्वयक या नात्याने माझ्यावर आहे .आपल्याशी समन्वय साधत असताना निश्चित स्वरूपाने शिवसैनिकांना पदाधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. तरी आपण सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेना बळकट करण्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम करावा असे आव्हान आमदार डॉ. राजन साळवी यांनी केले .

याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते तथा उमरगा लोहाराचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले  म्हणाले की शिवसेना हा वाघाचा कळप आहे संकट समयी सर्वसामान्याला मदत करणारा शिवसैनिकच असतो. शिवसेनाप्रमुखाच्या विचाराची शिदोरी घेऊन एकनाथ शिंदे यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचा झंजावात निर्माण केलेला आहे तो झंजावात कायमस्वरूपी लातूर जिल्ह्यामध्ये तेवत ठेवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे .मी आपल्या शेजारचाच असून ज्या ज्या वेळेस आपण आवाज द्याल त्या त्या वेळेस निश्चित स्वरूपाने आपल्या सोबत शिवसेना वाढीसाठी मी नेहमी सदैव आहे शिवसैनिकांनी आपलं लक्ष साध्य करण्यासाठी जोखीम घेऊन कामाला लागले पाहिजे माझ्याकडे लातूर जिल्ह्याची धाराशिव जिल्ह्याची सदस्य नोंदणीसाठी ची जबाबदारी देण्यात आलेली आहे त्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितोय की शिवसेनेची सक्रिय सदस्य प्राथमिक सदस्य मोहीम यशस्वी करून जास्तीत जास्त शिवसैनिक सदस्य नोंदणी करून गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक निर्माण करावेत. जेणेकरून शिवसेनेची बांधणी मजबूत होईल असे आव्हान माजी आमदार चौगुले  यांनी केले .याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांनी लातूर जिल्ह्यातील आढावा दिला.माजी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य तसेच तालुकाप्रमुख तानाजी सुरवसे, धनराज बिरादार ,विकास शिंदे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चना बिरादार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रमासाठी राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे सरचिटणीस वेंकटराव बिरादार, आबासाहेब शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख युवराज वंजारे, उपजिल्हाप्रमुख प्रसाद भोसले, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अर्चना बिरादार यावेळी निलंगा औसा देवणी व शिरूर अनंतपाळ या तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *