पुण्यात उच्चभ्रू सोसायटीत पुणे पोलिसांनी टाकलेल्या धाडीत एकनाथ खडसे यांचा जावई डॉ. प्रांजल खेवलकरसह चार पुरुष व दोन महिलांना अटक केल्यानंतर सरकार विरोधी बोलणाऱ्यांवर कशा कारवाया होतात असं म्हणत आरोप प्रत्यारोप होत आहेत .दरम्यान, शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अंधारे यांनी महत्त्वाचा दावा केलाय . पुण्यात शनिवारी रात्री झालेली पार्टी ही ‘हाऊस पार्टीच’ होती ‘रेव्ह पार्टी ‘ नव्हती . ज्या दोन महिलांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं या त्यांच्या मैत्रिणीच आहेत, असं शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्यात . पुण्यातील पोलीस एवढे तत्पर कधी झाले. याआधी आम्ही त्यांना माहिती दिली असल्याचेही त्यांनी सांगितलं .
काय म्हणाल्या सुषमा अंधारे ?
पुणे शहरातील खराडी परिसरात काल (शनिवारी) रात्री एका फ्लॅटवर सुरु असलेली रेव्ह पार्टी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकली. यावेळी पोलिसांकडून चार पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आहे. यामध्ये एकनाथ खडसे यांचे जावई यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली . यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या सुषमा अंधारेंनी महत्त्वाचा दावा केलाय . त्या म्हणाल्या,’पुण्यात शनिवारी रात्री झालेली पार्टी ही ‘हाऊस पार्टीच’ होती ‘रेव्ह पार्टी ‘ नव्हती . ज्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं या त्यांच्या मैत्रिणीच आहेत. क्रोनोलॉजी नीट समजून घ्या .जे जे लोक बोलत आहेत त्यावर कारवाई झाली.आज आधी पोलीस पोहचले मग मीडिया पोलिसांनी ब्रीफ दिले आणि मग बातम्या आल्या,पण खडसे यांनी जे आरोप केले त्या प्रश्नांची उत्तर दिले नाही. असंही अंधारे म्हणाल्या .
‘आहे त्या यंत्रणांचा कसा गैरवापर करावा हे भाजपकडून शिकण्यासारखं आहे आधी संजय राऊत बोलत होते .त्यांच्या मुलीच्या लग्नातल्या मेंहेंदीवाल्यापर्यंत ईडी नामक यंत्रणा पोहोचले आणि त्यांच्यावर कारवाई झाली .त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर नवाब मलिक बोलायला लागले .त्यांच्यावरही कारवाई झाली . खडसेंनी महाजनांवर आरोप केले .गेल्या चार दिवसांपासून शीतयुद्ध सुरू आहे .आज दरम्यान आज प्रांजल रेवलकरवरची कारवाई समोर येते . ‘ पुण्यात शनिवारी रात्री झालेली पार्टी ही रेव पार्टी असल्याचं सांगितलं जातं .यात खरंच अमली पदार्थ होते की नव्हते हा संशोधनाचा मुद्दा आहे . हे सगळे गृह खात्याची यंत्रणा ही फडणवीस साहेबांच्या हाताखाली आहे .अनेकजण फडणवीसांचे निकटवर्ती आहे हे वेगळं सांगायला नको . ती कारवाई झाल्यानंतर महाजन घाईघाईने मीडियासमोर बोलायला आले .त्यावेळी खडसेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर गिरीश महाजन यांनी एकाही मुद्द्याचं खंडन केलं नाही .’ असंही त्या म्हणाल्या.

ठाकरे बंधुंच्या भेटीवर म्हणाल्या..
शिवसेना उबाठाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवर सुषमा अंधारे म्हणाल्या,’ वारंवार दोन भावांचे काय होणार याची चिंता महायुती मधील अनेकांना होती.सगळी मंडळी सातत्याने बोलत होती.आमच्या नेत्यांनी आज आदर्श दिला आहे.हा दुगधशर्करा योग आहे. विरोधकांच्या प्रतिक्रिया बघा काय असती.पाच तारखेला मराठीच्या मुद्द्याला लोक एकत्र आली होती .आजची भेट ही कौटुंबिक भेट आहे .ही परिपूर्ण रिएक्शन आहे .आम्ही भाजपा सारखे 24 तास राजकारण करत नाही .असं सुषमा अंधारे म्हणाल्या .