• Fri. Oct 17th, 2025

जुगार खेळणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल. 02,06,750/- रूपयांचा मुद्देमाल जप्त

Byjantaadmin

Jul 27, 2025

जुगार खेळणाऱ्या 11 जणांवर गुन्हा दाखल. 02,06,750/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 लातूर :-   याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे.

          पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने पोलीस मळवटी गावाच्या शिवारातील एका शेतामधील शेडवर घरावर छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना 09 जणांना ताब्यात घेतले आहे,तर एक फरार व एक जुगार अड्डा चालविणारा इसम अशा दोन इसमांचा शोध सुरू आहे.यामध्ये 02,06,750/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून विवेकानंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.विवेकानंद पोलीस स्टेशनच्या मळवटी गावाच्या शेत शिवारातील एका शेतामधील पत्राच्या शेडवर येथे 26/07/2025 रोजी 1930 वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यादरम्यान आरोपी तिर्रट नावाचा जुगार रुपये लावून खेळत व खेळवीत असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे. यामध्ये रोख रक्कम, मोबाईल व जुगाराचे साहित्य असा एकूण 02,06,750 रुपयाचा चा मुद्देमाल जप्त केला आहे. 

            यामध्ये आरोपी 

तसा सविस्तर जप्ती पंचनामा लाईटच्या प्रकाशात केला आहे.

1) निरंजन वैजनाथ जाधव, वय 30 वर्षे ह.मु.अंबाहनुमान, लातुर रा. सुमठाणा ता. रेणापुर जि. लातुर, 

2) संभाजी सुगराम शिंदे, वय 32 वर्षे रा. मळवटी ता.जि. लातुर 

3) काशीनाथ रंगनाथ वाघमारे, वय-37 वर्षे, रा. मळवटी ता. जि. लातुर,

 4) दिनकर यशवंतराव गरड, वय-42 वर्षे, रा. मळवटी ता.जि. लातुर, 

5) संतोष किशनराव शिंदे, वय 48 वर्षे, रा. कासारखेडा ता. जि. लातुर

 6) संतोष गोरोबा गायकवाड, वय 28 वर्षे रा. मळयटी ता.जि. लातुर, 

7) धनाजी अशोकराव मेहकरे, वय 38 वर्षे रा. कोळपा ता.जि. लातुर

 8) महादेव बबन मोठेराव, वय 35 वर्षे रा. कोळपा ता.जि. लातुर.

 9) शुभम श्रिघर जाधव, वय 28 वर्षे, रा. सुमठाणा ता. रेणापुर जि. लातुर,

 पळुन गेलेला इसम 

10) हनमंत दगडु जाधव,वय 33 वर्षे रा. मळवटी ता.जि. लातुर.

स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी तिरंट नावाचा जुगार खेळविनारा

 11) दत्ता पांडुरंग शिंदे रा. मळवटी ता. जि. लातुर.

असे बेकायदेशिर रित्या स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी तिर्रट नावाचा जुगार खेळत असताना जुगाराच्या साहित्य, रोख रक्कम, मोबाईलसह एकुण 02,06,750/-रुपयाच्या मालासह मिळुन आल्याने त्यांच्या विरुध्द कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहे.सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे , पोलिस अंमलदार युवराज गिरी, सिद्धेश्वर मदने, जमीर शेख, राहुल कांबळे, चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *