यशवंत नागरी बँकेच्या तज्ञ संचालक पदी ॲड. परीक्षित अभिमन्यू पवार
लातूर – येथील यशवंत नागरी सहकारी बँक लि. लातूरच्या तज्ञ संचालक पदी ॲड. परीक्षित अभिमन्यू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या संचालक मंडळाची सभा आज शनिवार दि. २६ जुलै २०२५ रोजी चेअरमन प्रा. सुहास बा. पाचपुते यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात ही नियुक्ती करण्यात आली आहे.यासभेस बँकेचे व्हा. चेअरमन सूर्यभान पाटील, संचालक प्रा. वसंतराव पाटील, राजेंद्र कोळगे, विष्णुपंत साठे, प्रा. राजकुमार जाधव, चंद्रकांत साळुंके, प्रा. धर्मराज तांदुळजेकर, सुरेश राठोड, ॲड. आदिमाया गवारे यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी शाम कापसे आदी उपस्थित होते. दरम्यान ॲड. परीक्षित अभिमन्यू पवार यांचा यशवंत नागरी बँकेच्या मुख्य कार्यालय येथे संचालक मंडळ, शाखाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थित सत्कार करण्यात आला.
