प्रत्येक भारतीयांना इतिहास माहिती असायलाच पाहिजे,अन्यथा भुगोल बिघडायला वेळ लागणार नाही- शिवशंकर मिरगाळे
निलंगा,(आयुब बागवान)
भारत देशाच्या इतिहासात जेव्हा – जेव्हा युद्ध झाले तेव्हा तेंव्हा युद्धामध्ये भारतीय सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले व देशासाठी अतुलनीय कामगिरी बजावली आजही आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.शिवाय देशासाठी बलिदान द्यायला प्रत्येक भारतीय तयार असतो. प्रत्येक भारतीयांना आपल्या देशाचा आपल्या सैनिकाचा सार्थ अभिमान आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयांना आपला देशाचा इतिहास माहिती असायला पाहिजे,अन्यथा भुगोल बिघडायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन शिवशंकर मिरगाळे यांनी केले. ते शहीद श्रीधर चव्हाण शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था निलंगा येथे दि.२६ जुलै रोजी कारगिल विजयी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.याप्रसंगी आय एम सी सदस्य दत्तात्रय पांढरे, वैभव दडपे यांनी प्रशिक्षणार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.

या विजयी दिनानिमित्त माजी सैनिक राजू गायकवाड,शाहिद श्रीधर चव्हाण यांचे पिता व्यंकटराव चव्हाण माता सौ.सविता चव्हाण यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला, या प्रसंगी आय एम सी सदस्य शिवशंकर मिरगाळे, दत्तात्रय पांढरे, बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश कांबळे, संस्थेचे गट निदेशक श्री. पांचाळ प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.