अन्नत्याग आंदोलन मागे घ्या कृतीबद्ध कार्यक्रम आखून प्रश्न मार्गी लावू -माजी मंत्री आ.संभाजीराव पाटील निलंगेकर…
निलंगा प्रतिनिधी :- निलंगा मतदारसंघातील महादेव कोळी समाजाचा प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक लावून किमान कालावधीत प्रश्न सोडवू असे अभिवचन सकल आदिवासी कोळी समाजाच्या आंदोलन कर्त्याना माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी दिले.
सकल आदिवासी कोळी समाजाचे उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोरील गत पाच दिवसा पासून चालू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला विद्यमान आमदार तथा माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सकाळी साडेअकरा वाजता भेट देऊन आंदोलन कर्ते यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी उपस्थित आदिवासी कोळी समाज बांधवांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले मी लोकप्रतिनिधी असल्यामुळे मला हा प्रश्न माहित आहे. पण काही किचकट गोष्टीच्या बाबतीमध्ये निर्णय करताना कालबद्ध निर्णय घ्यावे लागतील एवढे दिवस आंदोलन चालले हे दुर्दैवी असल्याची खंत व्यक्त करून म्हणाले ,माझ्या विधानसभा मतदारसंघातील कोळी बांधवांवर अन्याय होतोय याची मला जाण आहे. हा आदिवासी कोळी समाज आमचा पारंपरिक मतदार असून आमच्या आजोबापासून ते माझ्यापर्यंत ते माझ्या पाठीशी आहेत त्यांचा प्रश्न सोडवणे हे माझे कर्तव्य समजून मी प्रयत्न करीत आहे. अधिवेशनामध्ये सुद्धा हा प्रश्न मी बऱ्याचदा उचलून धरलेला आहे. माझ्या सहकारी आमदारांना सुद्धा या प्रश्नाच्या बाबतीमध्ये विधिमंडळात सहकार्य करण्यास सांगितले आहे. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे याची जाणीव तुम्हाला सुद्धा आहे,परंतु हा प्रश्न किचकट बनलेला असल्यामुळे वरिष्ठ स्तरावर बैठका लावणे जिल्हाधिकारी तसेच शासनातील वरिष्ठ मंत्री यांच्याशी सुद्धा मी तुमची बैठक लावून देण्याचा प्रयत्न करीन पण त्यासाठी मला थोडासा वेळ आपण दिला पाहिजे असे सांगून 85 वर्षाचे मुढे मामा तसेच चंद्रहंस नलमले ,माधव पिटले, बालाजी औटी, व इतर पदाधिकारी यांनी हे आंदोलन मागे घ्यावे एक महिन्याच्या कालावधीमध्ये वरिष्ठ स्तरावरून प्रश्न सोडण्याचा आपण प्रयत्न करू तो जर नाही सुटला तर मी सरकार मध्ये असलो आमचे सरकार असेल तरीसुद्धा मी तुमचे आगामी होणाऱ्या आंदोलनामध्ये तुमच्या सोबत बसून हा प्रश्न निकाली लावेल असे अभिवचन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी उपस्थित उपोषण कर्त्याना दिले.
‘कोळी महादेव’ समाजाच्या अन्नत्याग उपोषणाला मराठा सेवा संघ-संभाजी ब्रिगेडने पाठिंबा दिला आहे.कोळी महादेव समाजाला जातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळाले पाहिजेत यासाठी पाठिंबा देण्यात आला आहे यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हा संघटक विनोद सोनवणे, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रमोद कदम आदी उपस्थित होते.
