लातूरमधील विलासराव देशमुख मार्गाच्या कामाला गती द्या;
बांधकाम परवान्यांचे पूर्नवलोकन करा: आमदार अमित देशमुख यांचे निर्देश
लातूर प्रतिनिधी:
लातूर महापालीका प्रशासन, सार्वजनीक बांधकाम विभाग आणि महावीतरण व इतर
संबंधीत विभागाच्या यंत्रणानी परस्परात समन्वय ठेऊन लातूर शहरातील विलासराव देशमुख
या मार्गाच्या नावीन्यपूर्ण प्रकल्पाला गती दयावी, अशा सुचना माजी मंत्री, आमदार अमित
विलासराव देशमुख यांनी या संदर्भाने आयोजीत केलेल्या बैठकी दरम्यान केल्या आहेत.
लातूर शहरात जुन्या रेल्वे लाईनच्या ठिकाणी पब्लीक प्लाझा, वॉकीक ट्रॅक, सायकल
टॅ्रक, सीटीबस स्टॉप अशा नावीन्यपूर्ण सुवीधासह विलासराव देशमुख मार्ग विकसीत
करण्यात येत आहेत. संबंधित विभागात समन्वयाचा अभाव असल्यामुळे या मार्गाच्या
उभारणीत अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे या मार्गाचे बांधकाम गतीने होत नाही, ही
बाब लक्षात घेऊन माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सोमवारी दुपारी लातूर येथील
विश्रामभवन येथे महानगर पालीका आयुक्त श्रीमती मानसी मीना, सार्वजनीक बांधकाम
विभागाचे कार्यकारी अभियंता श्री निळकंठ, महावितरणचे अतिरीक्त कार्यकारी अभियंता श्री
जाधव व इतर संबंधित सर्व अधिकारी तसेच काही नागरीकांचे प्रतिनीधी यांची संयुक्त बैठक
घेतली.
या मार्गाच्याा आजूबाजूच्या नागरीकांशी चर्चा करुन आणि त्यांच्या अडचणी तसेच
सुचना सममजून घ्याव्यात, सर्व्हीस रोड आणि या रस्त्याची उंची समपातळीत असावी,
आवश्यक त्या ठिाकणी स्लोप देऊन नागरीकांच्या अडचणी दूर कराव्यात. हा रस्ता
लातूरकरांसाठी बांधला जात आहे ही बाब व्यवस्थित समजवून सांगीतल्यास नागरीकाकडून
रस्ता बांधकामात कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्यांनी सांगीतले. सर्व विभागानी
समन्वय ठेऊन कामाला गती देण्याची सुचना त्यांनी केली.
या कामासाठी निधी कमी पडू नये याची काळजी आपण घेत आहोत मनपाने यासाठी
वेळोवेळी मागणी नोंदवावी, शासनाकडे पाठपूरावा करुन ही मागणी मंजूर केली जाईल असेही
आमदार देशमुख यांनी महटले आहे.

बांधकाम परवान्याचे पूर्नवलोकन करावे
लातूर शहरात चुकीच्या पध्दतीने बांधकाम परवाने दिले जात असल्याच्या अनेक
तक्रारी आलेल्या आहेत यामुळे भविष्यात गंभीर समस्या निर्माण होण्याच्या शक्यता आहे.
नवीन वसाहतीत फलॅट सिस्टीम, ग्रुप हौसीग स्कीम या ठिकाणी पार्कीग अनिवार्य केली
जात नसल्याने रस्त्यावर वाहने पार्क केली जात आहेत. फायर फायटींग आणी डे्रनेज
सिस्टीम बाबतही अशाच अडचणी निर्माण होतात. अनेक ठिकाणी प्रचलीत रस्ते अडवून
बांधकामे केली जात आहेत. त्यामुळे अलीकडच्या काळात देण्यात आलेल्या बांधकाम
परवान्याचे पर्नवलोकन करुन त्यात दुरूस्ती कराव्यात, नव्याने बांधकाम परवाने देतांना या
सर्व नियमाचे पालन केले जावे याकामी स्वता मनपा आयुक्त मानसी मीना यांनी लक्ष
घालावे अशी सुचना माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी केली.
यावेळी उपायुक्तअ डॉ. पंजाबराव खानसोळे, उपअभियंता राजेंद्र बिराजदार मनपाचे
शहर अभियंता नवनाथ केंद्रे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता विजय चव्हाण, नगररचनाकार
जमादार, लातूर शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक बुद्धीराज सुकाळे, लातूर शहर उत्तरचे
महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद दुधाळे, आर्किटेक्चर बंटी जाधव, डॉ.
नितीन भराडिया, डॉ.राहुल सूळ, डॉ. बामनकर, डॉ. शरद शिंदे आदीसह संबंधित विभागाचे
अधिकारी उपस्थित होते