सकल आदिवासी कोळी महादेव समाजाच्या अन्नत्याग उपोषणाला विविध संघटनेचा पाठिंबा
………
निलंगा, : कोळी महादेव समाजाला सुलभतेने जातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, रक्त नात्यातील व्यक्तीला वैधता प्रमाणपत्र देण्याबाबत परिपत्रक काढावे, 1950 पूर्वी कोळी नोंदी असलेल्या व्यक्तींना त्या आधारावर जात प्रमाणपत्र निर्गमित करावे यासह विविध मागणीसाठी गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अन्नत्याग उपोषणाला विविध सामाजिक संघटना व पक्षाच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला.
सकल आदिवासी महादेव कोळी जमातीचे सोमवारपासून उपविभागीय कार्यालय निलंगा येथे अन्नत्याग उपोषण सुरू आहे या उपोषणाला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे किसान सेलचे अध्यक्ष प्राध्यापक अण्णासाहेब मिरगाळे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला त्याच बरोबर लहुजी शक्ती सेनेचे गोविंद सूर्यवंशी त्यानी पाठिंबा दिला. पंचायत समितीचे माजी सभापती आता काँग्रेसचे अजित माने यांनीही पाठिंबा दिला. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख शिवाजी माने, उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, सुधीर पाटील, भगवान जाधव यांनी पाठिंबा देऊन हा प्रश्न लवकरात लवकर निकाली लावण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष घालण्याची विनंती करून अशा आश्वासन त्यांनी यावेळी दिले. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, उद्धव मेकाले यांनी पाठिंबा दिला. सकल मराठा समाजाच्या वतीने उपोषण कर्त्याच्या विविध मागण्याला आमचा पाठिंबा आहे म्हणून जाहीर पाठिंबा दिला यावेळी ईश्वर पाटील, विशाल जोळदापके, किरण पाटील, प्रमोद कदम, राहूल बिरादार, सतिश फट्टे, सचिन पवार, प्रदिप कदम या सर्वाधिक मराठा बांधव उपस्थित होते.
