जात पडताळणीसाठी जी कागदपत्रे लागतात तीच जात प्रमाणपत्रासाठी मागतात
उपविभागीय अधिकाऱ्याकडून जाणुन बुजुन अडवणूक
अन्नत्याग उपोषण कर्त्याचा आरोप
…..
निलंगा,: जातीचे प्रमाणपत्र देताना सखोल चौकशी न करता प्राथमिक पुराव्या आधारे प्रमाणपत्र वितरित करावे असे शासनाचे व वेगवेगळ्या प्रकरणात मा. उच्च न्यायालयाचे आदेश असताना जी कागदपत्रे जात पडताळणी प्रमाणपत्रा साठी लागतात ती कागदपत्रे जातीच्या प्रमाणपत्रासाठी उपभागीय अधिकारी यांच्याकडून सरसकट मागणी केली जात असून जात प्रमाणपत्राची जाणूनबुजून त्यांच्याकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप अन्नत्याग उपोषणकर्त्यांनी केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी मतदारसंघांमध्ये निलंगा, देवणी व शिरूरअनंतपाळ तालुक्यातून मोठ्या प्रमाणात समाज बांधवांनी जातीचे दाखले मिळावे म्हणून प्रस्ताव दाखल केले आहेत त्यावेळी टी सी च्या आधारे जवळपास 27 प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी निलंगा यांनी दिली आहेत परंतु सध्या जात प्रमाणपत्र काढण्यासाठी प्रकरणे प्रलंबित टाकून तहसील स्तरावर पाठवली जात आहेत. 1950 चा जात नोंदीचा पुरावा दाखल करावा, रक्त नात्यांमध्ये वैद्यता प्रमाणपत्र सादर करावे, महादेव कोळी नोंद असलेला जुना पुरावा द्यावा अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्याकडून केली जात असून या कारणामुळे प्रकरणे प्रलंबित टाकत आहेत.
जमात प्रमाणपत्र निर्गमीत करताना केवळ प्राथमीक पुराव्याआधारे जमात प्रमाणपत्र निर्गमीत करावे. सन. 1950 चा पुराव्याचा आग्रह करु नये. तसेच जमात प्रमाणपत्र निर्गमी करताना उमेदवाराच्या प्राथमिक पुराव्याआधारे जमात प्रमाणपत्र निर्गमीत करावे. जमात प्रमाणपत्र निर्गमीत करताना सखोल चौकशी अभिप्रेत नाही. अश्या स्वरुपाचे माननीय उच्च न्यायालयाचे खालील न्यायनिर्णय त्यामध्ये अरुण धनंजय नलावडे वि. महाराष्ट्र शासन रिट याचिका क्रं. 6399/2013 आदेश दि.18.03.2014, रामकृष्णा गजानन येरडलावार वि. महा. सरकार निट याचिका क्रं. 11602/2023, आदेश
दि.15.09.2024, विवेक व्यंकटी तोटावार वि. महा. शासन रिट याचिका क्रं. 11584/2023, आदेश दि. 15.09.2024, पुजाश्री प्रकाश टिंगवार रिट बॉक्स क्रं. 4279/2023 दि. १७.०४.२०२३ असे अनेक न्यायालयाचे निर्णय आहेत शिवाय शासनाने सरसकट पन्नास वर्षांपूर्वीचा पुराव्याचा आग्रह धरू नये असा शासन निर्णय आहे तरीही संबंधित अधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र देताना अडवणूक केली जात असून जी कागदपत्रे जात पडताळणी प्रमाणपत्र (वैधता) साठी लागतात ती कागदपत्रे जातीच्या प्रमाणपत्रासाठी उपभागीय अधिकारी यांच्याकडून सरसकट मागणी केली जात असून जात प्रमाणपत्राची जाणूनबुजून त्यांच्याकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप अन्नत्याग उपोषणकर्त्त तथा सकल आदिवासी कोळी महादेव जमातीचे नेते चंद्रहास नलमले यांनी आरोप केला आहे.
……
अन्नत्याग उपोषणाचा आजचा दुसरा दिवस असून या उपोषणाकडे कोणता लोकप्रतिनिधी अथवा वरिष्ठ अधिकारी फिरकला नाही या उपोषणातील 85 वर्षाचे हरिश्चंद्र मुडे यांची प्रकृती खालावल्याने रात्री निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते परंतु सकाळी पुन्हा त्याने उपचार डावलून उपोषणाच्या ठिकाणी हजर झाले.
……..
