• Tue. Aug 12th, 2025

“त्या” वादग्रस्त गट शिक्षण अधिकाऱ्याला  सक्तीच्या रजेवर पाठवा.. भीम आर्मीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Byjantaadmin

Jul 25, 2025

“त्या” वादग्रस्त गट शिक्षण अधिकाऱ्याला  सक्तीच्या रजेवर पाठवा.. भीम आर्मीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

लातूर,

वादाच्या भोवऱ्यात सापडलेले  वादग्रस्त निलंगा  पंचायत समितीचे  गटशिक्षणाधिकारी श्री. सुरेश गायकवाड हे त्यांच्या अनागोंदी व मनमानी कारभाराबद्दल जिल्हाभरात  बहुचर्चित आहेत.त्यामुळे त्यांच्या वादग्रस्त  कारभाराबद्दल सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या विविध संघटनानी त्यांच्या कारभाराची  उच्चस्तरीय खाते निहाय चौकशी करणे, त्यांना सेवेतुन तात्काळ बडतर्फ करणे,त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवणे  इत्यादी मागण्यासह अनेक मागण्यांसंदर्भात संदर्भात मा. जिल्हाधिकारी लातूर ,  मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. लातूर यांच्याकडे तक्रारी निवेदन देण्यात आलेली आहेत. त्यामुळे त्यांची निःपक्ष खातेनिहाय  चौकशी पुर्ण झाल्याशिवाय संबंधितांच्या नेतृत्वाखाली कोणतीही चौकशी समिती गठित करण्यात येऊ नये अथवा कोणत्याही चौकशी कामी  त्यांना नेमण्यात येऊ नये  ते स्वतः वादग्रस्त असल्यामुळे स्वतःच्या बचावासाठी चौकशीचा बागलबुवा उभा करुन वरिष्ठ प्रशासनाची दिशाभूल करण्याची  शक्यता नाकारात येत नाही. त्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे.व त्यांची चौकशी बंद दाराआड न करता खुल्या वातावरणात करण्यात यावी,त्याचप्रमाणे 

सदरच्या प्रकरणाशी संबंधित चौकशीचे काम विदयमान गट शिक्षणाधिकारी श्री. सुरेश गायकवाड यांच्याकडे सोपविण्यात आले तर या प्रकरणामध्ये नैसर्गिक न्याय होणार नाही. तसेच सदर गट शिक्षण अधिकारी  सुरेश गायकवाड हे या प्रकरणाशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या संबंधीत असल्यामुळे एकतर्फी व अन्यायकारक असा चौकशीचा अन्याय कारक निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अश्या वादग्रस्त व सदरच्या प्रकरणाशी हितसंबंध असल्यामुळे गट शिक्षण अधिकारी  श्री. सुरेश गायकवाड यांच्याकडे कोणतीही चौकशी अथवा त्याअनुषंगाने करण्यात येणारी कारवाईचे कामकाज त्यांच्याकडे सोपविण्यात येवु नये अन्यथा भीमआर्मी या सामाजिक  संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकारी जि. प. लातूर यांच्या कार्यालयात अंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर तालुका अध्यक्ष अतुल सोनकांबळे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *