भंगार चिंचोली येथे स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळवण्यासाठी प्रशिक्षण….
निलंगा : स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था, लातूर आणि एक्सिस बँक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निलंगा तालुक्यात मौजे भंगार चिंचोली येथे महिलांना स्वावलंबन बनवण्यासाठी शेती पूरक व्यवसायिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने देण्यात आले.
स्वयंम शिक्षण प्रयोग ही संस्था इ. सन 1993 पासून कार्यरत आहे. या संस्थेचे काम सात राज्यात चालू असून ही संस्था सौर ऊर्जा, कौशल्यविकास, उद्योजक महिला आणि शेती यांवर काम करत आहे. आतापर्यंत सात राज्यातील 32 जिल्हे आणि 3 हजार 274 गावामध्ये पोहोंचली असून आतापर्यंत 60 लाख महिलांना प्रशिक्षण देण्यात आले असून 3 लाख 50 हजार महिलांना प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार मिळाला आहे. सध्या ऍक्सीस बँक फाउंडेशन अंतर्गत निलंगा तालुक्यामध्ये 100 गावामध्ये काम करत आहे. तालुक्यातील मौजे भंगार चिंचोली येथे पाच दिवशीय शेती पूरक व्यवसायाचे प्रशिक्षण चालू आहे. यात शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळी पालन, कुकूट पालन या व्यवसायाबद्दल व तसेच जाणवरांचे लसीकरण, चारा नियोजन, गोठा व्यवस्थापन यावर डॉ. प्रसाद कदम यांनी प्रशिक्षण दिले आहे. यात प्रकल्प समव्यक दिपक लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली देवणी औसा, निलंगा या तीन तालुक्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे काम चालू आहे. निलंगा तालुका समन्वयक सुनील काळुंके यांनी संस्थेची व प्रकल्पात चालणारे वेगवेगळे प्रशिक्षण याविषयी सविस्तर माहिती दिली आहे.यावेळी गावातील अनेक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
