महाराष्ट्र महाविद्यालयातील एनसीसीच्या विद्यार्थ्यांची यशाची परंपरा कायम.
निलंगा – संरक्षण मंत्रालय, भारत सरकार यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेल्या राष्ट्रीय छात्र सेना या विभागाद्वारे दरवर्षी बी आणि सी सर्टिफिकेट ची परीक्षा घेण्यात येते. महाराष्ट्र महाविद्यालय येथील बी सर्टिफिकेट परीक्षा एकूण सोळा विद्यार्थ्यांनी दिली होती. तसेच सी सर्टिफिकेट परीक्षा पंधरा विद्यार्थ्यांनी दिली होती. विद्यार्थ्यांनी वर्षभर घेतलेल्या मेहनतीचे फळ म्हणजेच शंभर टक्के लागलेला निकाल आहे. या दोन्ही परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी बी आणि सी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम महाविद्यालयाद्वारे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस. गायकवाड, प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा पोलीस स्टेशनचे एपीआय सदा वाघमारे, 53 महाराष्ट्र बटालियन तर्फे हवालदार सुनील काळे, हवालदार शिवाजी होळकर, उप प्राचार्य प्रशांत गायकवाड, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. डी. एस. चौधरी, एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ व्ही. पी. सांडूर तसेच महाविद्यालयातील एनसीसी अधिकारी डॉ. एस. पी. बसुदे यांच्या उपस्थितीत पार पडला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविक डॉ. बसुदे यांनी केले. प्रमुख पाहुणे वाघमारे यांनी सर्व विद्यार्थ्यांना एनसीसी चे महत्व सांगतच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अध्यक्षीय समारोपामध्ये डॉ. बी.एस.गायकवाड यांनी एनसीसी मधील असलेल्या एकता आणि शिस्त याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय पाटील निलंगेकर, संस्था सचिव बब्रुवान सरतापे तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.
