शिवसेना वाढीसाठी एकनाथ शिंदे हे नावच उभारी देत आहे- शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने
निलंगा (अयुब बागवान):- लातूर जिल्ह्यामध्ये सक्रिय सदस्य नोंदणी निलंगा येथून प्रारंभ करण्यात आली शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह निलंगा येथे निलंगा देवणी दोन्ही तालुक्याच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजी माने म्हणाले की शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यांमध्ये सक्रिय सदस्य मोहीम राबविण्यात येत आहे. सक्रिय सदस्य मोहीम ही अत्यंत जोखमीची बाब असून आपण सर्वांनी आतापर्यंत पक्षाचे सदस्य मोहीम राबवलेली आहे. याच अनुषंगाने शिवसेनेच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपले सक्रिय सदस्य फॉर्म भरून घेतले पाहिजे प्रत्येक गावातल्या शाखाप्रमुखाने आपल्या शाखेमार्फत किमान 20 सक्रिय सदस्य भरणे गरजेचे आहे. या सगळ्या प्रक्रियेमधून शिवसेनेला उभारी देत असताना निश्चित स्वरूपाने अभिमानाने सांगता येईल अशी बाब जर असेल तर पक्ष उभारी साठी फक्त एकनाथराव शिंदे नावच भरपूर आहे कारण तत्कालीन मुख्यमंत्री पद भूषवत असताना एकनाथराव शिंदे यांनी जे काही निर्णय घेतले हे निर्णय सर्वांना मनापासून आवडलेले निर्णय असून या निर्णयाची अंमलबजावणी झाली त्या सर्व योजना चालू आहेत. त्यामुळे लोकाचां खूप मोठा वर्ग अत्यंत समाधानी आहे आणि म्हणून राजकीय पक्षांमध्ये फक्त आणि फक्त सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांबद्दल जी आपुलकी आणि प्रेम जनतेत निर्माण झालेली आहे ते इतर पक्षातल्या कुठल्याही नेत्याकडे मिळत नाही. ही खास आणि विशेष आनंदाची गोष्ट आहे. म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांनी सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी पक्षाची मजबुत बांधणी करणे यावर विशेष लक्ष केंद्रित करावे व तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी सज्ज राहावे असे आव्हान शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने साहेब यांनी केले. यावेळी सक्रिय सदस्य नोंदणी फॉर्म सुरुवात करत असताना शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य यांचा पहिला फॉर्म भरून सुरुवात करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील, देवणी तालुक्याचे तालुकाप्रमुख धनराज बिरादार, निलंगा शहराचे शहर प्रमुख मुस्तफा शेख, बालाजीराव भोसले देवणी संजय कुंभार शिवसेनेमध्ये असंख्य कार्यकर्त्यांसह प्रवेश केलेले शरद पेटकर ,किरण पाटील, अंकुश मोरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते
