लातूर –

लातूर ग्रामीण मधील एकुरगा (ता. लातूर) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीचा वर्ग नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीचा वर्ग सुरू करावा अशी मागणी आतुर ग्रामीणचे माजी आमदार श्री धिरज विलासराव देशमुख यांनी केली
शाळेत आठवीचा वर्ग मिळावा म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांनी व पालकांनी जिल्हा परिषदेच्या आवारात येऊन मंगळवारी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा श्री राहुल कुमार मीना आणि मा शिक्षणाधिकारी (प्राथमिक आणि माध्यमिक) यांना पत्र पाठवून माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी वरील मागणी केली
एकुरगा येथील ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीचा वर्ग द्यावा अशी मागणी केली आहे. या मागणीचा सकारात्मक विचार अद्याप शिक्षण विभागाने घेतलेला नाही त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांनी पालकांनी जिल्हा परिषदेत येऊन आंदोलन केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत शिक्षण घेण्याऐवजी त्यांना आंदोलन करावे लागणे हे न पटणारे आहे. या घटनेचा संवेदनशील त्यांनी विचार करून शिक्षण विभागाने आठवीचा वर्ग मंजूर करावा असे माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.