• Tue. Jul 15th, 2025

प्रवाशांच्या खिशातील पैसे  चोरणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 01 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

Byjantaadmin

Jul 15, 2025

प्रवाशांच्या खिशातील पैसे  चोरणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. 01 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

             लातूर:- बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशातील रोख रक्कम चोरणाऱ्या गुन्ह्यातील आरोपीला अटक. पन्नास हजार रोख रकमेसह गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकलसह एकूण 01 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी. याबाबत थोडक्यात माहिती अशी की,पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी/अमलदारांचे पथक चोरीच्या गुन्ह्याचा तपास करीत आहेत. सदर पथकामार्फत जिल्ह्यातील विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण करण्यात येत होते. तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती. दरम्यान 13/07/2025 पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून बस मधील प्रवाशांच्या खिशातील पैसे चोरणारा संशयित इसम उदगीर मधील एका हॉटेल समोर मोटरसायकलसह थांबलेला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन  रोडवर थांबलेल्या इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्यांचे नाव

1) सचिन मधुकर कसबे वय 31 वर्ष राहणार जय नगर लातूर.असे असल्याचे सांगितले.

त्याच्या ताब्यातील मोटर सायकलची झडती घेतली असता नमूद गाडीच्या डिग्गीमध्ये 50 हजार रुपयाची रोख रक्कम मिळून आली. सचिन कसबे याला विश्वासात घेऊन नमूद रक्कमबाबत विचारपूस केली असता त्याने काही महिन्यापूर्वी सदरची रक्कम उदगीर बसस्थानक मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशाच्या खिशातून चोरी केल्याचे कबूल केले. पोलीस ठाणे उदगीर शहर च्या अभिलेखाचे पाहणी केली असता पोलीस ठाणे येथे उदगीर बसस्थानक मधून रोख रक्कम चोरीला गेल्याच्या गुन्हा दाखल असल्याचे समोर आलेनमूद आरोपीने वर गुन्ह्यात चोरलेली रोख रक्कम 50 हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 01,25,000 /- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस ठाणे उदगीर शहर हे करीत आहेत.सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस उप-निरीक्षक संजय भोसले,पोलीस अमलदार संजय कांबळे, योगेश गायकवाड, सूर्यकांत कलमे, तुळशीराम बरुरे, चालक पोलीस अमलदार चंद्रकांत केंद्रे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *