शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश निलंगा:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडारवाडा बुजरूगवाडीचे माजी विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये उंच झेप घेत यश संपादित केले त्याबद्दल गावातील सरपंच शिवाजी जाधव साहेब, विठ्ठल भोयबार साहेब, साहेबराव भोयबार साहेब, भरत संगपाल साहेब, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुजरुगवाडी चे मुख्याध्यापक श्री शिवाजी जाधव सर, तसेच साईनाथ माने सर , दत्ता पदकुंडे सर दत्ता पोतदार सर या सर्वांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा शाल, हार, रजिस्टर देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री तांबोळी सर व शिक्षक श्री ढगे सर यांनी खूप प्रयत्न केले.
