निलंगा येथील शांतीवन स्मशानभूमी मधील तमाशा थांबवुन जनसामान्याचा शोक भावनेचा आदर करावा
निलंगा: 15/07/2025, निलंगा येथे सर्वांच्या सहभागाने प्रगत अशी सार्वजनिक शांतीवन स्मशान भूमी आहे. त्या शांतीवन स्मशान भूमीसोबत सर्वांच्या दुःख भावना जुळलेल्या आहेत. तरी सुद्धा बऱ्याच दिवसा पासून काही महाशय त्या ठिकाणी नृत्य संगीत, वाढदिवस साजरा करणे, सत्कार करणे असे आनंद उत्सवा चे कार्यक्रम आयोजीत करत आहेत. त्या मुळे जनसामान्यांची शोक भावना दुखावली जात आहे. त्यामुळे जनसामान्याच्या भावनेचा आदर करून अश्या नवटंकी व भंपक व्यक्ती वर गुन्हा नोंद करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सर्व सामान्य जनतेकडून होत आहे. याची प्रशासनाने दखल घ्यावी असे आव्हान अजित निंबाळकर व त्यांच्या शिष्ट मंडळानी केली आहे. सदरील निवेदन संबंधित अधिकारी उपजिल्हाधिकारी कार्यालय निलंगा व पोलिस स्टेशन निलंगा यांना देण्यात आले. यावेळी मोहन शिरसागर,डॉ. एच.जी निंबाळकर, सुधाकर दाजी पाटील, शरद पेटकर, शामराव सूर्यवंशी, बाबा राऊत, गोविंद सुर्यवंशी, विलास देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, बभ्रुवान पाटील, या सह असंख्य निलंगवासी उपस्थित होते. प्रशासन यावर तात्काळ कारवाई करेल अशी सर्व सामान्य जनतेला अपेक्षा आहे.
