• Tue. Jul 15th, 2025

तिर्रट जुगार खेळणाऱ्या 37  जणांवर गुन्हा दाखल. 5,19,500/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. 03 पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाची कारवाई

Byjantaadmin

Jul 15, 2025

तिर्रट जुगार खेळणाऱ्या 37  जणांवर गुन्हा दाखल. 5,19,500/- रूपयांचा मुद्देमाल जप्त. 03 पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाची कारवाई

 याबाबत याबाबत थोडक्यात माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात वेळोवेळी मोहीम राबवून अवैध धंदे करणाऱ्या विरुद्ध गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्यात येत आहे.त्याचाच एक भाग पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांचे आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी चे पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे, पोलीस ठाणे उदगीर शहरचे पोनि गाडे, उदगीर ग्रामीणचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गायकवाड, पोउपनि कदम यांच्या नेतृत्वातील संयुक्त पथकाने उदगीर तालुक्यातील देवणी पोलीस ठाणे हद्दीतील मोघा शिवारातील एका बंद जागेवर छापा मारून तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना 37 जणांना ताब्यात घेतले आहे.

 यामध्ये 5,19,500/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून देवणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. देवणी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील उदगीर- बिदर रोडवरील मोघा येथे 13/07/2025 रोजी 22.40 वाजण्याच्या सुमारास छापा टाकण्यात आला. यादरम्यान  37 आरोपी तिर्रट नावाचा जुगार रुपये लावून खेळत व खेळवीत असताना सापडल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आले आहे. यामध्ये रोख रक्कम 2,45,000/- रु तसेच मोबाईल किंमत- 2,74,500/- रुपये असे किंमत अंदाजे- 5,19,500/- रू चा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये आरोपी 

1) संजीवकुमारा माधवराव बिरादार वय-45 वर्षे रा. भालकी ता. भालकी जि. बिदर 

2) श्रीकांत मनोहर खासेमपुरे वय-32 वर्षे रा.बिदर ता.जि.बिदर

 3) पांडुरंग भिमराव धायगुडे, वय-41 वर्षे रा. कासारशिर्सी ता.निलंगा 

4) नंदकुमार चंद्रकांत बेल्लाळे, वय-37 वर्ष रा. सुलतानबागवाडी ता. हुमनाबाद जि.बिदर 

5) महादेव बाबुराव मसकल्ले, वय-26 वर्षे रा.बिदर ता. जि.बिदर

 6) रामेश्वर राजकुमार शेटकार ,वय 29 वर्षे रा. भालको ता. भालकी जि. बिदर 

7) मेघराज आशोक पाटील वय-35 वर्षे रा.बेरीबी ता. भालकी जि. बिदर

 8) कैलाश रमेश पाटील वय-35 वर्ष रा.भालकी जि. बिदर 

9) राजकुमार रामचंद गौड वय-34 वर्षे रा.हल्लाळी ता. भालकी 

10) चंद्रकांत जगन्नाथ तळघाटे वय-42 वर्षे रा.संतपुर ता. औराद

 11) सल्लाऊदीन अहमदपाशा शेख वय-32 वर्षे रा.संतपुर ता. औराद

 12) चंद्रकांत गणपती पाटील वय-32 वर्षे रा.संतपुर ता. औराद जि. बिदर 

13) कल्लपा धनराज तळघाटे वय-35 वर्ष रा.संतपुर ता. औराद

 14) बंडेप्पा घाळेप्पा कन्नाळे वय-50 वर्षे रा.संतपुर ता.औराद 

15) शरणु शिवराज राजापुरे वय-42 वर्ष रा.भालकी ता. भालकी 

16) मारोती संगप्पा मळे वय-38 वर्षे रा. वल्लेपुर ता. औराद जि.बिदर

 17) अनिल कल्लप्पा दापके वय-45 रा. जुन्नेखेरी ता. औराद जि.बिदर 

18) महेश सिद्राम बिरादार वय-32 वर्षे रा. नागराळ ता. भालकी जि.बिदर

19) रविंद्र कल्लप्पा जिर्गे वय-35 वर्षे रा.ऐकलर ता. औराद 

20) गणेश मलिकार्जुन अंदुरे वय-34 वर्ष रा.पाटोदा बु. ता.जळकोट 

21) शरणप्पा बसप्पा रंजिरे वय-51 वर्ष रा. सुलतानपुर ता. हुमनाबाद जि. बिदर 

22) हानमंत विरशेटीअप्पा जानते वय-38 वर्षे रा. सुलतानपुर ता. हुमनाबाद जि.बिदर 

23) नरसिम्हा व्यंकया गट्टे वय-67 वर्ष रा. काजीपल्ली विलेज शासकीय शाळेच्या जवळ हैद्राबाद 

24) जयपाल व्यंकटराम रेडी वय-42 वर्ष रा. जिलेलगुडा हैद्राबाद,

25) भिम व्यंकटराव बुक्केवाड वय-36 वर्ष रा.सावरगाव ता. देवणी

 26) अर्जुन सुभाष बिरादार वय-35 वर्ष रा.सावरगाव ता. देवणी 

27) सहदेव श्रीधर बिरादार वय-27 वर्षे रा. सावरगाव ता. देवणी 

28) खालेद गफारसाब कुरेशी वय-40 वर्ष रा. उदगीर ता.उदगीर

 29) राहुल आशोक कदम वय-35 वर्ष रा. नालंदा नगर उदगीर 

30) सत्यनारायण रमेश व्ही. वय 70 वर्ष रा.गटकेसर ता. गटकेसर जि. रंगारेडी,  

31) हानमंत अशोक वारे वय 45वर्षे रा मुखेड जि नांदेड, 

32) किरण कुमार वय 40 वर्षे  रा कत्तापेठ ता जि हैद्रबाद,

33) नयुम मेहबुबसाब शेख, वय 35 वर्षे, रा. बनशेळकीरोड उदगीर, 

34) सुरेश चंद्रया एन. वय  48 रा. हैद्राबाद, 

35) प्रमोद विदयसागर धुमाळे यांचा समावेश असुन ते या ठिकाणी हजर होते तसेच 

36) वजीर महेबुबसाब बंगाली रा. उदगीर हा सदर जुगार क्लब चालवतात.

 सदर क्लबचे जागेचे मालक 

37) शिवाजी अण्णाराव नेमताबादे (पाटील)

          यांच्याविरुद्ध देवणी पोलीस स्टेशन मध्ये गुरनं 234/2025 कलम  223 व 112 BNS सह कलम 12 (अ)  4, 5 महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा नोंद झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पोउपनि व-हाडे करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे देवणी, उदगीर शहर व उदगीर ग्रामीणच्या पोलिस अधिकारी अमलदारांच्या संयुक्त पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *