• Wed. Jul 16th, 2025

प्रभुराज प्रतिष्ठान व नाना नानी ग्रुपच्या वतीने गांधीगिरीने आयुक्तांना निवेदन

Byjantaadmin

Jul 15, 2025

प्रभुराज प्रतिष्ठान व नाना नानी ग्रुपच्या वतीने गांधीगिरीने आयुक्तांना निवेदन…
दि.१५.७.२२०५ रोजी प्रभुराज प्रतिष्ठान व नाना नानी पार्क ग्रुप च्या वतीने गांधीगिरी मार्गाने निवेदन….
लातूर शहरात एकमेव असलेले मा.विलासरावजी दगडोजीराव देशमुख पार्क हे मनपाच्या अगदी कांहीं अंतरावर आहे.येथील पार्क दुरावस्था झालेली आहे.या कडे मनपा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.त्यामुळे प्रभुराज प्रतिष्ठान व नाना नानी पार्क ग्रुप च्या वतीने हातात दिवा घेऊन तसेच मनपा प्रशासनाचा कारभार …दिव्याखाली अंधार. असे बोलके फलक घेऊन गांधीगिरी मार्गाने नियमित स्वच्छता, तीन वर्षापासून पाणी नसलेले शौचालय, महिला सुरक्षिते बाबत सी सी टी.वी.कॅमेरा, बसविणे, नवीन ओपन जीम, ट्रॅक ची दुरुस्ती असे अनेक मागणीचे निवेदन मा .आयुक्तांना देण्यात आले.या निवेदन ची दखल घेऊन त्वरित प्रशासनाला पार्क परिसरात नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करावेत व निवेदनात दिलेले मागणी पूर्ण करेल असे आयुक्तांनी उपस्थित नागरिकांना कळविले.यावेळी अँड.अजय कलशेट्टी, मोइज भाई शेख,अँड.शिरीष दहिवाल,अँड.शिवकुमार बनसोडे,अँड.सोमेशराव वाघमारे,कुणाल वागज,शिरीष माळी,बंडाप्पा जवळे,हुसेन पठाण,विलास भूमकर,अजय घाळे,दीपक गटागट,निळकंठ स्वामी,दत्ता ढगे,सुनील कोटलवार,मोतीराम कदम,अभिजित शिरसाट,नंदकुमार बनाळे,अंगत कोंपले,काशीनाथ बोराळे,महेश पटणे,अकणारू,दत्तात्रय अपसिंगेकर,पारस चापसी,अशोक पंचाक्षरी,अशोक कांबळे,शाम सावंत, आदी नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *