आ. निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपर्क संवाद व जिल्हा परिषद गटाची महत्वपूर्ण बैठक
निलंगा : माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा विधानसभा मतदारसंघातील जिल्हा संपर्क संवाद आणि अभियानांतर्गत जिल्हा परिषद गटाची महत्त्वपूर्ण बैठक लातूर शासकीय विश्रामगृह येथे संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील विविध भागातील प्रश्न व समस्या जाणून घेत, त्यावर सखोल चर्चा केली. तसेच नागरिकांचे जीवनमान अधिक सुरळीत व सुखकर करण्यासाठी आवश्यक त्या सूचना सर्वांना केल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, निलंगा विधानसभा प्रभारी दगडू सोळंके, शिरूर अनंतपाळ तालुकाध्यक्ष माधव बिरादार, देवणी तालुकाध्यक्ष शिवराज बिरादार, निलंगा बाजार समितीचे सभापती शिवकुमार चिंचनसुरे, औराद बाजार समितीचे सभापती नरसिंग बिराजदार, देवणी बाजार समितीचे सभापती सदाशिव पाटील, शिरूर अनंतपाळ बाजार समितीचे सभापती गोविंद चिलकुरे, निलंगा बाजार समितीचे उपसभापती लालासाहेब देशमुख, औराद बाजार समितीचे उपसभापती शाहूराज थेटे, माजी तालुकाध्यक्ष मंगेश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
