गटविकास अधिकारी सोपान अकेले यांच्या हस्ते पंचायत समितीच्या प्रांगणात वृक्षारोपण
निलंगा : निलंगा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट विकास अधिकारी सोपान आकेले यांच्या हस्ते नुकतेच गुरुपौर्णिमेनिमित्ताने निलंगा पंचायत समितीच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले. निलंगा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले हे गेली अनेक वर्षांपासून पंचायत समितीच्या आवारात वृक्ष लावून त्याचे संगोपन व संवर्धनासाठी प्रयत्न करत असतात. वृक्ष चळवळी मुळे परिसराचे नंदनवन होताना दिसत असून, त्यांनी मियावाकी पद्धतीनं वृक्ष लागवड करून वेगळा पॅटर्न राबवला आहे. सतत वेगळा विषय घेत ते तालुक्यात कर्तव्यदक्ष व वृक्ष प्रेमी अधिकारी म्हणून सोपान अकेले यांची निर्माण झाली आहे. त्यांच्या या पॅटर्न ला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या सह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन या केलेल्या कार्या बद्दल त्यांचे अभिनंदन ही केले आहे. विशेष म्हणजे कोणताही सण असो की, उत्सव असो, त्या निमित्ताने ते वृक्ष लावून निलंगा पंचायत समिती आनंदोत्सव साजरा करण्यात येत अल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी मोहोळकर, कुलकर्णी, रवींद्र डोंगरे, रजाक बागवान, रवींद्र सूर्यवंशी, आधी आधी पंचायत समिती कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
