दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या विरुद्ध ड्रंक अँड ड्राइव्हची कारवाई
लातूर :- पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात रात्री 11 नंतर विनाकारण फिरणाऱ्या, टवाळकी करणाऱ्या टवाळखोरावर कार्यवाही करण्यात येत असून 13 जुलै रात्री रात्री उशिरापर्यंत रस्त्यावर फिरणारे, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने लातूर शहरातील 5 नंबर चौकात दारू पिऊन वाहन चालवण्यावर कार्यवाही केली. सुजुकी बर्गमन मोटरसायकल क्रमांक एम.एच.24 सी.ए.0995 चा चालकाची ब्रेथअनालायझर द्वारे तपासणी केली असता त्याने मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन करून त्याच्या ताब्यातील मोटरसायकल अतिशय वेगात, वेडीवाकडी पद्धतीने चालवीत असताना मिळून आल्याने त्याच्यावर पोलीस ठाणे एमआयडीसी येथे 185 मोटार वाहन कायदा 1988 (सुधारणा सन 2012) अन्वये कार्यवाही करण्यात आली असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाणे करीत आहेत. सदरची कारवाई मोहीम नियमित चालू राहणार असून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या विरुद्ध लातूर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
