रात्री अकरानंतर विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू. पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या सूचनेवरून पोलीस रस्त्यावर
लातूर :- याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील महत्त्वाच्याव इतर संवेदनशील भागात आत्ता विशेष गस्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. रात्री अकरानंतर विनाकारण फिरत असलेले टोळके, टवाळकी करत फिरणारे तरुण, दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांना पोलीस ठाण्यात नेऊन कारवाई करण्यात येत आहे.

पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांनी पदभार घेताच लातूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हेगारी संदर्भात विविध उपायोजना राबवीत आहेत. त्या अनुषंगाने दिनांक 13 जुलै रोजी रात्री पोलीस अधीक्षक अमोल तांबे ,अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांचे सूचना व मार्गदर्शनात रात्री अकरानंतर विनाकारण रस्त्यावर रेंगाळणाऱ्या टवाळखोरावर कार्यवाही करण्यात आली आहे. त्यांना सूचना घेऊन रस्त्यावरून हाकलून देण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी अंमलदार यांचेमार्फत ही संयुक्त मोहीम यापुढे राबविण्यात येणार आहे.रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून,दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांची तपासणी करण्यात येत आहे. या शिवाय चारचाकी वाहनांत रात्री बेकायेदशीर वाहतूक होते का? याचाही तपास सुरू करण्यात येत आहे.
शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राहावी शांतता असावी विनाकारण फिरणाऱ्यावर नियंत्रण ठेवता यावे. गुन्हेगारांची धरपकड करून वेळीच गुन्ह्यांना पायबंध घालने, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी, या उद्देशाने ही कारवाई सुरू करण्यात आली रात्री अकरा नंतर रस्त्यावर रेंगळणाऱ्यांची कसून तपासणी करण्यात येणार असून ट्रिपल सीट फिरणाऱ्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडील कागदपत्रांची तपासणी होत आहे. लातूर पोलिसाकडून सर्व आस्थापनाधारकांना आवाहन करण्यात येत की, गैरसोय टाळण्यासाठी आपण निर्धारित वेळेतच आस्थापना चालू व बंद करावे.विनाकारण रात्री उशिरापर्यंत आस्थापना चालू ठेवू नये.पोलीस प्रशासनास सहकार्य करावे.